अरुण सुतार यांची जि. प. च्या ‘जलसंधारण समिती’वर निवड  

चंदगड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीवर जि.प. सदस्य अरुण सुतार यांची निवड करण्यात आली. जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र  सुपूर्द करून त्यांचा सत्कार केला. यावेळी महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या सूचनेनुसार घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला जि. प. मध्ये  झालेल्या… Continue reading अरुण सुतार यांची जि. प. च्या ‘जलसंधारण समिती’वर निवड  

राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

वायनाड (वृत्तसंस्था) : कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मला अजिबात आवडलेली नाही. असली भाषा चालणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना चांगलंच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली.… Continue reading राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोजेक्ट करावं लागतयं : चंद्रकांत पाटील  

पुणे (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री  प्रवास करत आहेत, हे स्वागतार्ह आहे. पण वाईट याचे वाटते की, शरद पवार यांना वारंवार मुख्यमंत्र्यांना प्रोजेक्ट करावे लागत आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.  पत्रकारांशी ते बोलत होते. पाटील म्हणाले की, सरकार एकत्र चालवायचे म्हणून शरद… Continue reading शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोजेक्ट करावं लागतयं : चंद्रकांत पाटील  

‘त्या’ कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : आरपीआयची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआर येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर तिघा अत्यवस्थ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या सर्व दुर्घटनेची चौंकशी करून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्वरित मदत देण्यात यावी. अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आज (सोमवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सीपीआरमध्ये काही दिवसापूर्वी… Continue reading ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : आरपीआयची मागणी

विरोधकांचे आमच्यावर वैफल्यातून आरोप : सतीश पाटील (व्हिडिओ)

आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेतील कामकाजावरून विरोधक आमच्यावर वैफल्यातून आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिले आहे.  

आजची जि. प. सभा म्हणजे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने काळा दिवस : विजय भोजे (व्हिडिओ)

जिल्हा परिषदेची सभा गोंधळामध्ये गुंडाळण्यात आली, असा आरोप करीत हा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने काळा दिवस असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय भोजे आणि माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केली.  

‘त्यांना’ पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री ! : शरद पवार

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले आता पुन्हा माझ्याशी संपर्क साधू लागले आहेत. मात्र, सोडून गेलेल्यांना आता पुन्हा राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. अर्थात, शरद पवार यांनी डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता केलेल्या या विधानाची… Continue reading ‘त्यांना’ पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री ! : शरद पवार

महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे सर्वच प्रमुख पक्षांमध्ये राजकीय हालचाली सुरू झाल्या आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षातर्फे शहरातील सर्व प्रभागात उमेदवार देण्याच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा असणारे आणि नवे इच्छुक असलेले प्रभागातील तरुण मंडळांशी संपर्क वाढवला आहे. महापालिकेवर सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे.… Continue reading महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली

राज्यपालपदावर राहायचे की नाही, हे ‘त्यांनी’ ठरवावे : शरद पवार

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना  या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचीही प्रतिष्ठा राखायला हवी. कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जी भाषा वापरली याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद… Continue reading राज्यपालपदावर राहायचे की नाही, हे ‘त्यांनी’ ठरवावे : शरद पवार

भटक्या-विमुक्त जातीजमाती तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल मलगुंडे…

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त जाती जमातीच्या तालुकाध्यक्ष पदी म्हासुर्ली पैकी बाजारीचा धनगर वाडा येथील विठ्ठल सोनबा मलगुंडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. सोळांकुर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.   ए. वाय. पाटील म्हणाले,  मलगुंडे यांनी या अगोदर राधानगरी तालुका धनगर समाज क्रांतिकारक… Continue reading भटक्या-विमुक्त जातीजमाती तालुकाध्यक्ष पदी विठ्ठल मलगुंडे…

error: Content is protected !!