हातकणंगले पं.स. सभापती, उपसभापतींचा राजीनामा

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीचे सभापती प्रदिप नानासो पाटील व उपसभापती पूनम आनंदा भोसले यांनी आज (गुरूवार) आपल्या पदाचे राजीनामे दिले.  विधान परिषदेची बिनविरोध झालेली निवडणूक आणि कोल्हापूर जिल्हा बँक व वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नेत्यांनी जुळवलेली नविन राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर राजीनाम्यांना महत्व प्राप्त झाले आहे. उपसभापती पूनम भोसले यांनी सभापती प्रदिप पाटील… Continue reading हातकणंगले पं.स. सभापती, उपसभापतींचा राजीनामा

माझं वय २३ आहे, २५ होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही : रोहीत पाटील

सांगली  (प्रतिनिधी)  : राष्ट्रवादी पक्ष आणि आबांचं कुटुंबीय तालुक्यातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं आहे. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते, अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माझं वय २३ आहे. २५ होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही,  असा इशारा राष्ट्रवादीचे युवानेते व आर.आऱ.आबांचे चिरंजीव रोहीत पाटील यांनी विरोधकांना दिला. कवठेमहांकाळ  येथे… Continue reading माझं वय २३ आहे, २५ होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही : रोहीत पाटील

मनसेच्या फायर ब्रँड नेत्या राष्ट्रवादीत   

पुणे (प्रतिनिधी) : मनसेचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज (गुरूवार) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांनी  स्वागत केले. यावेळी अजित पवार म्हणाले  की, रुपालीताईंना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे… Continue reading मनसेच्या फायर ब्रँड नेत्या राष्ट्रवादीत   

कणेरीतील कर्मचाऱ्यांचा छ. शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनलला पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मौजे कणेरी येथील सेवा निवृत्त अधिकारी आणि सभासद कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज युवा शक्ती विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.   यावेळी सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, आपणाला कधीही साधी भेटही सत्तारूढ पॅनेलने दिली नाही. मग या परिवर्तन पॅनलला मतदान का करायचे, अशी भूमिका यावेळी व्यक्त केली. त्यामुळे नवीन उमेदवार यात बदल… Continue reading कणेरीतील कर्मचाऱ्यांचा छ. शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनलला पाठिंबा

वडगाव बाजार समिती निवडणूक : शाहू शेतकरी आघाडीचा नरंदे येथून प्रचार शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडगाव बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ नरंदे येथील नागोबा देवालय येथून आज (बुधवार) झाला. यावेळी माजी आ. अमल महाडिक, जि.प. सदस्य डॉ. राहुल आवाडे, युवा नेते विश्वेश कोरे यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. जिल्ह्यातील ताकदवान नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक… Continue reading वडगाव बाजार समिती निवडणूक : शाहू शेतकरी आघाडीचा नरंदे येथून प्रचार शुभारंभ

कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी ‘२०’ डिसेंबरला अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. द्विसदस्यीय दहा प्रभागाचा आराखडा तयार होत आला आहे. हा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर केला असून २० डिसेंबरला अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे. कुरुंदवाडच्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 22 हजार 372 इतकी लोकसंख्या आहे. गेल्यावेळी पालिका निवडणुकीत मतदारांची संख्या… Continue reading कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी ‘२०’ डिसेंबरला अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इम्पिरिकल डेटा संकलन करण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात तीन महिन्यांचा वेळ मागितला होता. पण निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे १०५ नगरपंचायतींची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. तर उर्वरीत निवडणुकांबद्दलचा निर्णय १७ जानेवारीला घेतला जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे. २७… Continue reading ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार

विधान परिषदेतील विजयाबद्दल भाजपचा आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ६ पैकी ४ जागांवर विजय मिळवला. त्याबद्दल आज (बुधवार ) कोल्हापुरात भाजप मंगळवार पेठच्या वतीने मिरजकर तिकटी येथे साखर, पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गणेश देसाई, मंगळवार… Continue reading विधान परिषदेतील विजयाबद्दल भाजपचा आनंदोत्सव

ठाकरे सरकारला धक्का : ओबीसी आरक्षणाबाबतची याचिका फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा देऊ शकत नसल्याचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारने न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज यावर सुनावणी होऊन सर्वोच्च… Continue reading ठाकरे सरकारला धक्का : ओबीसी आरक्षणाबाबतची याचिका फेटाळली

प्रवीण दरेकर ‘मजूर’ : सविस्तर चौकशी करण्याचे आदेश

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तसेच मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर हे ‘मजूर’ आहेत किंवा नाही, याची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सहकार आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना नोटीस पाठवली असून तुम्हाला अपात्र का घोषित करु नये? अशी विचारणा केली आहे. नोटीसमध्ये प्रवीण दरेकर हे त्यासाठी… Continue reading प्रवीण दरेकर ‘मजूर’ : सविस्तर चौकशी करण्याचे आदेश

error: Content is protected !!