सांगली  (प्रतिनिधी)  : राष्ट्रवादी पक्ष आणि आबांचं कुटुंबीय तालुक्यातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं आहे. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते, अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माझं वय २३ आहे. २५ होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही,  असा इशारा राष्ट्रवादीचे युवानेते व आर.आऱ.आबांचे चिरंजीव रोहीत पाटील यांनी विरोधकांना दिला.

कवठेमहांकाळ  येथे नगरपंचायती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.  यावेळी रोहितच्या भाषणाआधी पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणाले, की २५ वर्षाच्या तरुणाविरोधात सगळे एकत्र आले आहेत. यावर  उत्तर देताना रोहीत यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये रोहीत पाटील विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेले आहेत. खासदार संजय काका पाटील (भाजप), घोरपडे (शिवसेना),  सगरे गट (राष्ट्रवादी) आणि गजानन कोठावळे गट असे सर्व जण एकत्र येऊन महाविकास आघाडी निर्माण केली आहे.