कोल्हापूर (प्रतिनिधी) : मौजे कणेरी येथील सेवा निवृत्त अधिकारी आणि सभासद कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज युवा शक्ती विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.  

यावेळी सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, आपणाला कधीही साधी भेटही सत्तारूढ पॅनेलने दिली नाही. मग या परिवर्तन पॅनलला मतदान का करायचे, अशी भूमिका यावेळी व्यक्त केली. त्यामुळे नवीन उमेदवार यात बदल करू शकतील त्यामुळे आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराज युवा शक्ती विकास पॅनलाच भरघोस मतदान करून त्यांना निवडून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी उमेदवार अनिल सरदेसाई, अमित अवसरे, राजू सावंत, श्रीकांत कोरवी, शिवाजीराव फराकटे, रत्नमाला शिंदे आदी उपस्थित होते.