पुणे (प्रतिनिधी) : मनसेचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज (गुरूवार) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांनी  स्वागत केले.

यावेळी अजित पवार म्हणाले  की, रुपालीताईंना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे शहर पुढे जाईल,  महिलांचा विकास होईल.

अजित पवारांनी दिलेल्या हिमतीमुळे मला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली. पुण्याचे  पालकमंत्री म्हणून अजित पवार खूप चांगलं काम करत आहेत. मी ज्या कामांसाठी आतापर्यंत त्यांची भेट घेतली, ती सर्व कामे त्यांनी कायदेशीररित्या पूर्ण केली आहेत, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.  माझ्याच पूर्वीच्या पक्षातील काही लोकांना मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते, असा टोलाही रुपाली ठोंबरे यांनी लगावला.