आरक्षणाशिवाय ओबीसी जागांच्या निवडणुकीची सुधारीत तारीख जाहीर  

मुंबई (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आधीच्या रचनेप्रमाणे ७३ टक्के जागांसाठी २१ डिसेंबर रोजीच मतदान होईल. मात्र, ज्या जागांवर ओबीसी आरक्षण होते, त्या २७ टक्के जागा आता अनारक्षित म्हणून जाहीर केल्या असून त्या जागांसाठी पुढील महिन्यात १८ जानेवारीरोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.   या निवडणुकीच्या… Continue reading आरक्षणाशिवाय ओबीसी जागांच्या निवडणुकीची सुधारीत तारीख जाहीर  

जिल्हा बँक निवडणूक : ५ जागांसाठी थेट मातोश्रीवरून फोन..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी पॅनेल बांधणीसाठी हालचाली गतिमान झाल्या असताना शिवसेनेला पाच जागा देण्यात याव्यात, अशी सूचना थेट मातोश्रीवरून आली आहे. आज दुपारी याबाबत शिवसेना खा. संजय मंडलिक यांना फोन आला असून त्यांच्याकडे नावांची यादी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. विद्यमान २ जागा कायम ठेवून आणखी इतर गटातील ३ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या… Continue reading जिल्हा बँक निवडणूक : ५ जागांसाठी थेट मातोश्रीवरून फोन..!

इस्लामपूरचे इश्वरपूर नामकरण करण्यासाठी शिवसेना आक्रमक

इस्लामपूर (प्रतिनिधी) : इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे इश्वरपूर नामकरण करण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीवरुन तसा ठराव करण्यासाठी पालिकेची विशेष सभा आज (शुक्रवार) बोलवली होती. सभेपूर्वी शिवसेनेने पालिकेसमोर शक्तीप्रदर्शन करत आपली मागणी लावून धरली. नामकरणाच्या मागणीसाठी शिवसेनेने शहरात स्वाक्षरी मोहीम राबवली होती.  तत्पुर्वी शिवसेना कार्यालयापासून शिवसैनिक भगवे फेटे नेसून, भगवे ध्वज हातात घेवून… Continue reading इस्लामपूरचे इश्वरपूर नामकरण करण्यासाठी शिवसेना आक्रमक

काँग्रेस आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे ‘मोठी’ जबाबदारी  

मुंबई (प्रतिनिधी) : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचे पत्र काढले असून महाराष्ट्र काँग्रेस कार्याकारिणीने याची ट्विटवर माहिती दिली आहे. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची कन्या असलेल्या प्रणिती शिंदे यांची अभ्यासू आमदार म्हणून ओळख आहे. काँग्रेसमधील एक आश्वासक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरूणाईमध्ये… Continue reading काँग्रेस आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे ‘मोठी’ जबाबदारी  

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘यावेळी’ घेता येतील : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव राज्य सरकारने केला आहे. तर एप्रिल आणि मे महिन्यात पाऊस नसल्यामुळे यावेळी या निवडणुका घेता येतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तीन एक महिन्यात म्हणजे मार्च… Continue reading स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘यावेळी’ घेता येतील : अजित पवार

पैसे देताना मी कोरे यांच्यासोबत नव्हतो : ना. हसन मुश्रीफ   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक जनसुराज्य पक्षाचे प्रमुख व आ. विनय कोरे यांच्यासोबत लढवली. मात्र, पैसे दिले, त्यावेळी मी त्यांच्यासोबत नव्हतो, असा खुलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (गुरूवार) येथे केला. ते पत्रकारांशी बोलत होते. आ. कोरे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला ३५ लाख दिल्याची कबुली दिली. यावेळी मी आणि… Continue reading पैसे देताना मी कोरे यांच्यासोबत नव्हतो : ना. हसन मुश्रीफ   

हातकणंगले पं.स. सभापती, उपसभापतींचा राजीनामा

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीचे सभापती प्रदिप नानासो पाटील व उपसभापती पूनम आनंदा भोसले यांनी आज (गुरूवार) आपल्या पदाचे राजीनामे दिले.  विधान परिषदेची बिनविरोध झालेली निवडणूक आणि कोल्हापूर जिल्हा बँक व वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नेत्यांनी जुळवलेली नविन राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर राजीनाम्यांना महत्व प्राप्त झाले आहे. उपसभापती पूनम भोसले यांनी सभापती प्रदिप पाटील… Continue reading हातकणंगले पं.स. सभापती, उपसभापतींचा राजीनामा

माझं वय २३ आहे, २५ होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही : रोहीत पाटील

सांगली  (प्रतिनिधी)  : राष्ट्रवादी पक्ष आणि आबांचं कुटुंबीय तालुक्यातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं आहे. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते, अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माझं वय २३ आहे. २५ होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही,  असा इशारा राष्ट्रवादीचे युवानेते व आर.आऱ.आबांचे चिरंजीव रोहीत पाटील यांनी विरोधकांना दिला. कवठेमहांकाळ  येथे… Continue reading माझं वय २३ आहे, २५ होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही : रोहीत पाटील

मनसेच्या फायर ब्रँड नेत्या राष्ट्रवादीत   

पुणे (प्रतिनिधी) : मनसेचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज (गुरूवार) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांनी  स्वागत केले. यावेळी अजित पवार म्हणाले  की, रुपालीताईंना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे… Continue reading मनसेच्या फायर ब्रँड नेत्या राष्ट्रवादीत   

कणेरीतील कर्मचाऱ्यांचा छ. शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनलला पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मौजे कणेरी येथील सेवा निवृत्त अधिकारी आणि सभासद कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज युवा शक्ती विकास पॅनलला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.   यावेळी सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, आपणाला कधीही साधी भेटही सत्तारूढ पॅनेलने दिली नाही. मग या परिवर्तन पॅनलला मतदान का करायचे, अशी भूमिका यावेळी व्यक्त केली. त्यामुळे नवीन उमेदवार यात बदल… Continue reading कणेरीतील कर्मचाऱ्यांचा छ. शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनलला पाठिंबा

error: Content is protected !!