टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीचे सभापती प्रदिप नानासो पाटील व उपसभापती पूनम आनंदा भोसले यांनी आज (गुरूवार) आपल्या पदाचे राजीनामे दिले. 

विधान परिषदेची बिनविरोध झालेली निवडणूक आणि कोल्हापूर जिल्हा बँक व वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नेत्यांनी जुळवलेली नविन राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर राजीनाम्यांना महत्व प्राप्त झाले आहे.

उपसभापती पूनम भोसले यांनी सभापती प्रदिप पाटील यांच्याकडे, तर सभापती प्रदिप पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. दोघा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.