रेल्वे विभागाकडून ५३.३४ लाख पाणीपट्टी वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंतर्गत रेल्वे विभागाकडून ५३ लाख ३४ हजार ९९० रुपये वसूल करण्यात आले. शहरातील इतर २३ नळ कनेक्शन खंडित करुन इतर थकबाकीदारांकडून दि. ७ ते १० ऑक्टोंबर अखेर रु.६४ लाख १५ हजार ६१५ रक्कम वसूल करण्यात आली. यामध्ये शाहूनगर, फुलेवाडी रिंगरोड, शाहू कॉलनी, चंबुखडी, विशालनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, न्यू… Continue reading रेल्वे विभागाकडून ५३.३४ लाख पाणीपट्टी वसूल

रांगोळीच्या पवन कुरणेची आसाम रायफल्समध्ये निवड

रांगोळी (प्रतिनिधी) : येथील पवन प्रभाकर कुरणे याची आसाम रायफल्समध्ये कॉन्सटेबल पदासाठी निवड करण्यात झाली आहे. तो इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियमवर सराव करत होता. शेतकरी कुटुंबातील पवनला पहिल्यापासून आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती. यासाठी त्याचे वडील प्रभाकर कुरणे यांनी पवनला इचलकरंजी येथे रनिंग व लेखी क्लाससाठी पाठविले. १२ वी.नंतर आदर्श करिअर अकॅडमी येथे ६ महिने सराव… Continue reading रांगोळीच्या पवन कुरणेची आसाम रायफल्समध्ये निवड

संस्थापक पॅनेलला विजयी करण्याचा करवीर पूर्वचा निर्धार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू व भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या कपबशीची चिन्हाला मतदान करण्याचा निर्धार करवीर तालुका पूर्व ग्रामीण भागातील शेकडो  सभासदांनी केला आहे.  यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले, अर्बन बँकेत ग्रामीण भागातून बहुतांश व्यवहार होत आहेत. संस्थापकांनीही सर्व पक्षांच्या वतीने शिवाजीराव मोरे यांना उमेदवारी देऊन ग्रामीण भागाला… Continue reading संस्थापक पॅनेलला विजयी करण्याचा करवीर पूर्वचा निर्धार

अग्निवीरवायू पदासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत ‘अग्निवीरवायू’ पदाकरिता १७½  ते २१ वर्षाच्या आतील नोकरी इच्छुक अविवाहित मुले, मुलींकरिता पदभरती होणार आहे. इच्छुक मुला-मुलींनी https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. अर्ज… Continue reading अग्निवीरवायू पदासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२२-२३ अंतर्गत जिल्ह्याकरिता एकूण ३५०.८३ लाखाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. या अभियानामध्ये विदेशी फळपिक लागवड (ड्रॅगन फ्रुट लागवड), पुष्पोत्पादन कार्यक्रम (कंदवर्गीय फुले व सुट्टी फुले लागवड), मसाला पिके (मिरची, हळद… Continue reading एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन

नाट्यस्पर्धेतून प्रकाशदूतांच्या अंगभूत कलेचा अविष्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कलानगरी’ कोल्हापुरात नाट्यकला सादर करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब आहे. या नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून प्रकाशदूतांच्या अंगभूत कलेचा अविष्कार होत असल्याचे प्रतिपादन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले. महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा २०२२-२३ ‘नाट्यरंजन’चे उदघाटन दि. १० नोव्हेंबर रोजी नाळे यांचे हस्ते झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित या दोन… Continue reading नाट्यस्पर्धेतून प्रकाशदूतांच्या अंगभूत कलेचा अविष्कार

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करण्याची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावी या मागणीचे निवेदन गो संवर्ध महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी स्वीकारले. देशाचा अन्नदाता शेतकरी शेती उत्पादन खर्च वाढत असल्याने आर्थिक अडचणीत आहेत. तसेच तो आत्महत्या करत आहे. वास्तविक कृषीप्रधान भारत देशाची गेली हजारो… Continue reading राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करण्याची मागणी

कोल्हापुरातून पदयात्रेसाठी दहा हजार कार्यकर्ते रवाना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये हिंगोली जिल्ह्यात सहभागी होणार असून, हे कार्यकर्ते हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. हिंगोलीमधील पदयात्रेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या नियोजन बैठकीत कायदा सुव्यवस्था, पार्किंग, विविध विभागाकडून सर्व… Continue reading कोल्हापुरातून पदयात्रेसाठी दहा हजार कार्यकर्ते रवाना

शिरोली ग्रामपंचायतीवरील भ्रष्टाचाराचे आरोप धादांत खोटे

टोप (प्रतिनिधी) : शिरोली ग्रामपंचायतीवर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप धादांत खोटे आणि ग्रामस्थांची दिशाभूल करणारे आहेत. त्यांनी माहिती अधिकारातून खर्चाचे जे आकडे जाहीर केले, त्यापेक्षा जादा खर्च महाडिक आघाडीची सत्ता असताना झाला आहे. मग ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असे कसे म्हणता येईल. निवडणुकीसाठी त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, चौकशीकामी प्रशासनाला सर्व सहकार्य करणार आहे. आगामी काळात… Continue reading शिरोली ग्रामपंचायतीवरील भ्रष्टाचाराचे आरोप धादांत खोटे

राज्य शूटिंग स्पर्धेत अनुष्काला तीन पदके

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथे सुरू असलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने पदकांवर ३ मोहर उमटवली. स्पर्धेत कोल्हापूरसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, सातारा, जालनाव अन्य जिल्ह्यांतून ३५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. राज्य शूटिंग स्पर्धेत अनुष्काला तीन पदके मिळाली. दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५६७ गुण मिळवत पात्रता… Continue reading राज्य शूटिंग स्पर्धेत अनुष्काला तीन पदके

error: Content is protected !!