कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत ‘अग्निवीरवायू’ पदाकरिता १७½  ते २१ वर्षाच्या आतील नोकरी इच्छुक अविवाहित मुले, मुलींकरिता पदभरती होणार आहे.

इच्छुक मुला-मुलींनी https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. अर्ज करण्याकरिता आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक अहर्ता, वेतन तसेच नियम व अटीबाबत सविस्तर माहिती https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही माळी यांनी कळविले आहे.