कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू व भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या कपबशीची चिन्हाला मतदान करण्याचा निर्धार करवीर तालुका पूर्व ग्रामीण भागातील शेकडो  सभासदांनी केला आहे. 

यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले, अर्बन बँकेत ग्रामीण भागातून बहुतांश व्यवहार होत आहेत. संस्थापकांनीही सर्व पक्षांच्या वतीने शिवाजीराव मोरे यांना उमेदवारी देऊन ग्रामीण भागाला प्रतिनिधित्व दिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन सहकार टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

महाडिक युवाशक्तीचे तालुकाध्यक्ष अर्जुन इंगळे यांनी आधुनिक कार्यप्रणालीने स्वच्छ व पारदर्शी कारभार करणाऱ्या उमेश निगडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या कपबशी चिन्हाला मतदान करण्याचे सर्वपक्षीय सभासद, कार्यकर्त्यांच्या वतीने आवाहन केले. यावेळी पॅनल प्रमुख उमेश निगडे, गीता देवी जाधव यांनी सभासद हिताचा जाहीरनामा जाहीर करून तो राबविणार असल्याचे स्पष्ट केले.

गोकुळ शिरगाव येथे झालेल्या मेळाव्यासाठी टी. के. पाटील, एस एम. पाटील, (गोकुळ शिरगाव) राजू माने, काका पाटील (उजळाईवाडी), कृष्णात जोंधळेकर (तामगाव), नितीन संकपाळ (नेर्ली), युवराज पाटील (कोगिल), रवी मोरे कणेरी) आदी प्रमुखांसह करवीर दक्षिणपूर्व पंचक्रोशीतील सर्वपक्षीय सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.