रांगोळी (प्रतिनिधी) : येथील पवन प्रभाकर कुरणे याची आसाम रायफल्समध्ये कॉन्सटेबल पदासाठी निवड करण्यात झाली आहे. तो इचलकरंजी येथील राजाराम स्टेडियमवर सराव करत होता.

शेतकरी कुटुंबातील पवनला पहिल्यापासून आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती. यासाठी त्याचे वडील प्रभाकर कुरणे यांनी पवनला इचलकरंजी येथे रनिंग व लेखी क्लाससाठी पाठविले. १२ वी.नंतर आदर्श करिअर अकॅडमी येथे ६ महिने सराव केला होता. पवनने ३ वेळा आर्मी भरतीसाठी प्रयत्न केला होता पन फायनल मेरीट मध्ये फेल झाला होता. तसेच स्टाफ सिलेक्शन मध्ये २ वेळा १ मार्कने फेल झाला होता. भरतीसाठी वयाची मर्यादा संपत आली असताना जिद्द व चिकाटीचे जोरावर पुणे येथे शारीरिक, नागपूरला मेडिकल व कोल्हापूर येथील लेखी परीक्षा दिली.

याची स्टाफ सिलेक्शनमध्ये आसाम रायफल्सला कॉन्स्टेबल पदावर निवड झाली. पनवनच्या या यशाने रांगोळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने मान्यवर व रांगोळीकरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.