सांबरसदृश प्राण्याच्या मांस वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथे सांबरसदृश प्राण्याचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिस व वनविभागाने संयुक्तरीत्या कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून स्नॅपर रायफलही ताब्यात घेण्यात आली आहे. शहा सैफुद्दीन शमशुद्दीन (रा. बेंगळुुरू) व चेतन कुमार सुभाष चंद्र अभिगिरी (रा. गदग) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तुडीये-कोलिक रोडवर पोलिस निरीक्षक संतोष… Continue reading सांबरसदृश प्राण्याच्या मांस वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

भूमि अभिलेख : ‘क’ गटाची भरती परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबरला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भूमि अभिलेख विभागातील ‘क’ गटाची भरती परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबरला या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे, असे भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी कळविले आहे. गट ‘क’ पदसमूह ४ (भू-करमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात… Continue reading भूमि अभिलेख : ‘क’ गटाची भरती परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबरला

‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पिकांच्या नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील रब्बी ज्वारी (जिरायत) गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी लागू… Continue reading ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे’

भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव सादर करावा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सांडपाण्याचा निपटारा होण्याकरिता भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा. याचा शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. पंचगंगा नदी, रंकाळ्यासह इतर तलावांची प्रदूषणमुक्ती आणि शहरातील गंभीर ड्रेनेज लाईनच्या प्रश्नाबाबत ‘शिवालय’ शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी महापालिका… Continue reading भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव सादर करावा : राजेश क्षीरसागर

कळे येथील घराच्या नोंदीसाठीचे उपोषण स्थगित

कळे (प्रतिनिधी) : येथे सत्तर वर्षांपासूनची मातंग वसाहतीतील घरे शासन दरबारी नोंद करण्यासाठी ग्रामस्थांनी कसबा कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले. आचारसंहितेमुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले. येथील मातंग, मराठा, शिंपी, डवरी, लिंगायत समाजातील लोकांची घरे मातंग वसाहत व बेघर वसाहतीत असून, येथे नागरिक कायमस्वरूपी राहत आहेत. वीज, पाणी, शौचालय बांधण्यासाठी अनुदान, रस्ता व… Continue reading कळे येथील घराच्या नोंदीसाठीचे उपोषण स्थगित

ऊसतोडणी मजुरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

पेठवडगाव (प्रतिनिधी) : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून, परिसरात ऊसतोडणीची कामे सुरू झाली आहेत. ऊसतोडणी मजुरांकडून शेतकऱ्यांची मात्र आर्थिक लूट सुरू झाली आहे. ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या लवकर ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडे एकरी तीन ते चार हजार रुपये अॅडव्हान्स मागत असल्यामुळे शेतकऱ्यांचीही अडचण झाली आहे. हातकणंगले तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून, वारणा व पंचगंगा… Continue reading ऊसतोडणी मजुरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

ऐन थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण ‘हिट’

राशिवडे (कृष्णा लाड) : निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आणि कडाक्याच्या थंडीत वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार असून, गावच्या सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने निवडणुकीतील रंगत शिगेला पोहोचणार आहे. ‘गाव कारभारी’ होण्यासाठी तरुणाईबरोबर स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी, कार्यकर्ते कंबर कसून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक… Continue reading ऐन थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण ‘हिट’

संघटित एकजुटीमुळेच शिक्षकांच्या मागण्या मान्य

शिरोळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समन्वय समितीने एकजुटीतून केलेल्या आंदोलनामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य झाल्या आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनास यश मिळाले असून, यासाठी सरकारला ११६० कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. या आंदोलनात सहभागी असणारे शिक्षक नेते, सर्व संघटनेचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याबरोबरच सर्व शिक्षक आमदारांच्या प्रयत्नांची… Continue reading संघटित एकजुटीमुळेच शिक्षकांच्या मागण्या मान्य

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी निधी द्यावा : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून निधीची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या देखभालीसाठी, दुरूस्तीसाठी निधी देण्याची ग्वाही या छत्रपती संभाजीराजे यांना दिली. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून राजर्षि छ. शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अनेक ऐतिहासिक वारसास्थळे या शहरात… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी निधी द्यावा : संभाजीराजे छत्रपती

शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीस आकर्षक रोषणाई

विद्यापीठाच्या इमारतीस रोषणाई (छाया : सचिन कामत)

error: Content is protected !!