टोप ( प्रतिनिधी ) समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत हणमंतवाडी ता. करवीर येथील परिणीती राहुल तिबीले या विद्यार्थिनींनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला

परिणीती ही विद्यामंदिर हणमंतवाडी येथील या शाळेची विद्यार्थिनी असून तिने शंभर पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर आरोही शहाजी पुजारी हीचा राज्यात दुसरा क्रमांक आला.

परिणीती इयत्ता पहिली या वर्गात शिकते तिला शाळेच्या मुख्याध्यापक रानेश्र्वर थोरबोले, वर्गशिक्षिका लता पाटील, सुवर्णा शिनगारे, तिचे आई – वडील यांचे मार्गदर्शन लाभले. परिणीती ने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.