वारणानगर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलजी (ऑटोनॉमस) अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर (ता. पन्हाळा) येथे ५ एप्रिल रोजी ‘इम्पॅक्ट लेक्चर सिरीज’ या व्याख्यान मालिकेचे आयोजन आयआयसी (द इंस्टीट्यूट ऑफ इंनोवेशन कौन्सिल) आणि आयईडीसी सेलच्या मार्फत केले गेले. त्यामध्ये डी.वाय.पाटील एड्युकेशन सोसायटी चे डिन व रिसेर्च डायरेक्टर ‘डॉ.सी.डी.लोखंडे’ व सोशल इम्पॅक्ट अँड इनोवेशन, मुंबई चे इंडिपेंडेंट अँडवायझर प्रशांत मांडके’ हे प्रमुख पाहुणे लाभले.


यावेळी प्राध्यापक ए.आर.चौगुले यांनी, आयईडीसी बद्दल माहिती दिली. तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कार्जीनी यांनी क्लस्टर युनिव्हर्सिटी बद्दल माहिती दिली. डॉ.सी.डी.लोखंडे यांनी, पहिल्या सत्रात ‘इंडियन पेटंट रजिस्ट्रशन’ बद्दल खुलासा करून सांगितला. ‘पेटंट का रजिस्टर करावे, कोणत्या गोष्टीसाठी पेटंट करता येते व पेटंट चे नियम व पेटंट कसे करावे’ यासर्व गोष्टी सांगितल्या. तसेच दुसऱ्या सत्रात प्रशांत मांडके यांनी स्टार्ट-अप, इंनोवेशन आणि उद्योजकता याबद्दल आपले विचार स्पष्ट केले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयईडीसीच्या विद्यार्थ्यांनी केले. डॉ. उमेश देशन्नवार यांनी प्रतक्रिया व्यक्त केल्या. तसेच प्राध्यापक एस.एस.महाडीक ह्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. अणेकर, डीन एस. इ. टी. एम. डॉ. एस एम पिसे,आय.ई.डी.सी, आयआयसी समन्वयक प्राध्यापक ए.आर.चौगुले, प्रा. एस.एस.महाडीक, महाविद्यालयचे डीन, प्राध्यापक, आय.ई.डी.सी प्रेसिडेंट श्रुतिका पाटील, विद्यार्थी उपस्थित होते.