लॉकडाऊनचे उल्लघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई : लाखांचा दंड वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल (शनिवारी) रात्री लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. मास्क न वापरणारे एकूण २०६ जणांवर कारवाई करून त्यांचेकडून दंड ५३२०० वसूल केला आहे, मोटर वाहन एकूण केसेस ९०७, दंड वसूल १,१५,३००,आयपीसी १८८ नुसार एकूण २३ गुन्हे दाखल केले आहेत.… Continue reading लॉकडाऊनचे उल्लघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई : लाखांचा दंड वसूल

चोकाक येथे सात लाखांचे अवैध मद्य जप्त :  एकाला अटक

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पोलीसांनी चोकाक येथे छापा टाकून करून विदेशी दारू आणि कारसह ७ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी राजाराम भोपळे (रा. चोकाक) याला अटक केली आहे. ही कारवाई  महेश माने, प्रकाश लाड, संग्राम पाटील, अतुल निकम, सागर पोवार, प्रांजल कांबळे यांनी केली.

रुकडीमध्ये २० हजारांचा दारूसाठा जप्त

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पोलिसांनी रुकडी तालुका हातकणंगले येथे बागडी गल्लीत छापा टाकून अंदाजे २० हजार रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. अण्णा सकाराम बागडी राहणार रूकडी यांच्या घरा शेजारी पोलिसांना हा बेकायदेशीर साठा मिळाला. हातकणंगले पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पी एस आय सीमा बडे, पोलिस कॉन्स्टेबल संग्राम पाटील, अतुल निकम,… Continue reading रुकडीमध्ये २० हजारांचा दारूसाठा जप्त

सांडपाणी निचऱ्यावरून ग्रामपंचायत व रहिवाशी यांच्यात हाणामारी ; गुन्हा दाखल

कळे (प्रतिनिधी) : वारनुळ (ता.पन्हाळा) येथे सांडपाणी निचऱ्यावरून ग्रामपंचायत व रहिवाशी यांच्यात जोरात जुंपली. दरम्यान, खुद्द सरपंच व ग्रामपंचायत शिपाई यांनी स्थानिकांना मारहाण केली. याबाबत कळे पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली. वारनुळ ग्रामपंचायतीने गणेश गल्लीतील सांडपाणी श्रीमती रंजना मारुती पोवार यांच्या शेतीत सोडले आहे. सांडपाणी, प्लास्टिक कचरा यामुळे पिकाची नुकसानी होते. तसेच दुर्गंधी पसरली… Continue reading सांडपाणी निचऱ्यावरून ग्रामपंचायत व रहिवाशी यांच्यात हाणामारी ; गुन्हा दाखल

पाटपन्हाळा येथे ७ टन कलिंगड चोरीस : गुन्हा दाखल

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथे एक एकर शेतातील ७ टन कलिंगड चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द कळे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांतुन मिळालेल्या माहितीनुसार पाटपन्हाळा येथील राकेश रामचंद्र पाटील वय २७ यांनी गट नं ४४० अ.ब. देवस्थान समितीच्या एक एकर शेतात मेलोडी काळा पट्टा जातीचे १५०० नग असे एकुण ७० हजार  (अंदाजे) किमतीचे कलिंगड… Continue reading पाटपन्हाळा येथे ७ टन कलिंगड चोरीस : गुन्हा दाखल

‘लाईव्ह मराठी’ ब्रेकिंग :  आयटीआय कोव्हिड सेंटरमधून दोन कैदी पसार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा कारागृहाच्या आयटीआय कोव्हिड सेंटर केअर मधून दोन कैदी रात्री १२ च्या सुमारास पसार झाले. एकाच वेळी दोन कैदी पळून गेल्याने कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. हे दोन कैदी कोल्हापूर जिल्ह्यातील असून गोंदाजी नंदीवाले आणि प्रतिक सरकनाई अशी त्यांची नावे आहेत. यावेळी बंदोबस्तासाठी बाहेर तैनात असलेल्या पोलिसांच्या डोळ्यादेखत कैदी पसार झाल्याने कामात… Continue reading ‘लाईव्ह मराठी’ ब्रेकिंग :  आयटीआय कोव्हिड सेंटरमधून दोन कैदी पसार…

दोन मुलांच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार; तिघांवर गुन्हा…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दोन मुलांसह एक विधवा नदीपात्रात आढळून आली; त्यात दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यु झाला तर त्या विधवा महिलेवर उपचार सुरू आहेत. मात्र त्या दोन्ही मुलांवर पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अश्विनी पाटील असे त्या महिलेचे नाव असून अथर्व (वय ७) आणि श्रीराज (वय ४) अशी त्या दुर्दैवी… Continue reading दोन मुलांच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार; तिघांवर गुन्हा…

गांधीनगर येथे दोन हॉटेलवर छापा : हॉटेल मालकांसह ३४ जणांवर गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जमावबंदी, संचारबंदीचा आदेश डावलून आणि प्रतिबंधक आदेशाचा भंग करून गांधीनगर मेनरोडवरील उचगांव हद्दीतील हॉटेल चालू ठेवल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज (गुरुवार) छापा टाकून दोन हॉटेलमालकासह ३४ ग्राहक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. धीरज लखमीचंद केसवाणी (वय २३, रा साईबाबा मंदिर जवळ, गांधीनगर) आणि… Continue reading गांधीनगर येथे दोन हॉटेलवर छापा : हॉटेल मालकांसह ३४ जणांवर गुन्हा

नेज शिवपुरी येथे सेट्रिंग काम करणाऱ्या इसमाचा खून…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील नेज शिवपुरी येथील राजू वसंत जाधव अंदाजे (वय ४०) या सेट्रिंग काम करणाऱ्या इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली. मजले गावच्या हद्दीतील मांग कुडी नावाने ओळखले जाणाऱ्या शेतात ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी यावेळी दीपक जग्गनाथ कांबळे (मर्फी) याला खून झालेल्या ठिकाणावरून संशयीत म्हणून… Continue reading नेज शिवपुरी येथे सेट्रिंग काम करणाऱ्या इसमाचा खून…

बहादुरवाडी येथे कोल्ह्याच्या हल्ल्यात पाच जखमी…

बहादुरवाडी (प्रतिनिधी) : बाहदुरवाडीच्या गावाच्या पश्चिम बाजूला पांडूरंग कृष्णा देसावळे यांचा जनावरांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे सकाळी जनावरांच्या गोठ्याची साफ सफाई करीत असताना त्यांच्यावरती कोल्ह्याने हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी असून त्यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच तिथे असणाऱ्या इतर महिलांवरतीही कोल्ह्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यामध्ये चार स्त्री आणि एक पुरुष… Continue reading बहादुरवाडी येथे कोल्ह्याच्या हल्ल्यात पाच जखमी…

error: Content is protected !!