कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा कारागृहाच्या आयटीआय कोव्हिड सेंटर केअर मधून दोन कैदी रात्री १२ च्या सुमारास पसार झाले. एकाच वेळी दोन कैदी पळून गेल्याने कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. हे दोन कैदी कोल्हापूर जिल्ह्यातील असून गोंदाजी नंदीवाले आणि प्रतिक सरकनाई अशी त्यांची नावे आहेत.

यावेळी बंदोबस्तासाठी बाहेर तैनात असलेल्या पोलिसांच्या डोळ्यादेखत कैदी पसार झाल्याने कामात कुचराई केल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल तयार करून एसपी ऑफिसला पाठवणार असल्याचे कारागृह अधिक्षक चंद्रमणी इंदूलकर यांनी सांगितले.