हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पोलिसांनी रुकडी तालुका हातकणंगले येथे बागडी गल्लीत छापा टाकून अंदाजे २० हजार रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. अण्णा सकाराम बागडी राहणार रूकडी यांच्या घरा शेजारी पोलिसांना हा बेकायदेशीर साठा मिळाला. हातकणंगले पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पी एस आय सीमा बडे, पोलिस कॉन्स्टेबल संग्राम पाटील, अतुल निकम, सागर पोवार ह्यांच्या पथकाने ही कारवाई केली.