कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा येथे एक एकर शेतातील ७ टन कलिंगड चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द कळे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतुन मिळालेल्या माहितीनुसार पाटपन्हाळा येथील राकेश रामचंद्र पाटील वय २७ यांनी गट नं ४४० अ.ब. देवस्थान समितीच्या एक एकर शेतात मेलोडी काळा पट्टा जातीचे १५०० नग असे एकुण ७० हजार  (अंदाजे) किमतीचे कलिंगड अज्ञातांनी चोरल्याचे काल सायंकाळी त्यांच्या लक्षात येताच त्यांनी कळे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ चव्हाण करत आहेत.