आळते येथे गळफास घेऊन शेतमजूराची आत्महत्या…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते येथे संजय शिवलिंग कुंभार (वय ४७) यांनी राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय कुंभार हा शेतमजूर म्हणून काम करतो. आज सकाळी घरी कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची फिर्याद संजयचे चूलत भाऊ कुबेर कुंभार… Continue reading आळते येथे गळफास घेऊन शेतमजूराची आत्महत्या…

परखंदळे येथे शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदीत बुडून मृत्यू…

कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील परखंदळे येथे कुंभी नदीवर पोहायला गेलेल्या प्रसाद गणपती देसाई (वय १६) या शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार) सकाळी साडे सातच्या सुमारास गोठे- परखंदळे पुला दरम्यान घडली. दहावी इयत्तेत शिक्षण घेत असलेला प्रसाद देसाई हा गेल्या काही दिवसांपासून गोठे पुलाजवळ पोहायला जात होता. त्याला योग्यरित्या पोहताही येत… Continue reading परखंदळे येथे शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदीत बुडून मृत्यू…

गारगोटीत मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलीसांची दंडात्मक कारवाई : २० हजारांचा दंड वसूल

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी शहर आणि परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिला आणि पुरुष अशा ४० जणांवर भुदरगड पोलीस ठाण्याने कारवाई केली. यावेळी  प्रत्येकी रुपये ५०० रुपयांचा दंड आणि दोन तास पोलीस स्टेशनमध्ये थांबण्याची शिक्षा देण्यात आली. दरम्यान, ही दंडाची रक्कम देण्यासाठी लोकांच्या नातेवाईकांची धावपळ झाली होती. भुदरगचे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी, लॉकडाऊन काळात जनतेला… Continue reading गारगोटीत मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलीसांची दंडात्मक कारवाई : २० हजारांचा दंड वसूल

आजऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई लाखोंची गोवा बनावटीची दारू पकडली  

आजरा (प्रतिनिधी) : आजरा पोलिसांनी आज पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास गोवा बनावटीची सुमारे ५ लाख ३५ हजारांची दारू जप्त केली आहे. ही सर्वात मोठी कारवाई गवसे चेक पोस्ट येथे करण्यात आली. गाडीमध्ये बदल करून दारू ठेवण्यासाठी विशिष्ट कप्पा करण्यात आला होता परंतु पोलीस कॉन्स्टेबल अमर अडसूळ यांच्या नजरेतून सदरची गोष्ट लपून राहिली नाही. त्यातून हि… Continue reading आजऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई लाखोंची गोवा बनावटीची दारू पकडली  

तिरपण येथील महिलेचा शॉक लागून मृत्यू

कोतोली (प्रतिनिधी) : धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी केलेल्या तिरपण (ता. पन्हाळा) येथील ६० वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. येथील सरसाबाई पांडुरंग माने या आपल्या जुन्या घरातील जनावरांच्या शेडामध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. जनावरांच्या शेडमधील सर्व कामे आटपून कपडे धुतली व ती कपडे घराच्या भिंती… Continue reading तिरपण येथील महिलेचा शॉक लागून मृत्यू

त्यांनी रेमडेसेवीरचं इंजेक्शन चोरल : केला हा धक्कादायक प्रकार

जयपूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या संकटात औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राजस्थानमधील कोटा इथं असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णांवर उपचाराकरिता उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता एक मोठा खुलासा झाला आहे. या दोन्ही भावांपैकी एकाने दोन रुग्णांसाठी रेमडेसेवीरचं इंजेक्शन चोरलं आणि त्यानंतर रुग्णांना पाण्याचं इंजेक्शन टोचलं. जे… Continue reading त्यांनी रेमडेसेवीरचं इंजेक्शन चोरल : केला हा धक्कादायक प्रकार

ए.वाय.पाटील, आर.के.पोवार, भैय्या मानेंसह राष्ट्रवादीच्या १८ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला असून संचारबंदी लागू असताना शासन नियमांचे उल्लंघन करून परवानगी न घेता लोक एकत्र जमवून निदर्शने केल्याप्रकरणी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील, आर.के.पोवार, प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या सह १८ जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कडक… Continue reading ए.वाय.पाटील, आर.के.पोवार, भैय्या मानेंसह राष्ट्रवादीच्या १८ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर मद्य विक्री : गांधीनगरमधील तरुणावर गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेकायदेशीररित्या विदेशी दारू विकणार्‍या गुलशन गोपालदास अहुजा (वय २५, रा. शिरू चौक गांधीनगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४४ हजार २७९ रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले. जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू असताना  अहुजा घरात दारूचा साठा करून विकत होता. याबाबत पोलीस नाईक राजेंद्र दिनकर कुंभार यांनी फिर्याद दिली असून अहुजा याच्यावर गांधीनगर… Continue reading बेकायदेशीर मद्य विक्री : गांधीनगरमधील तरुणावर गुन्हा

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! लष्कर भरती पेपर फुटी प्रकरणात बडया अधिकार्‍यास अटक

पुणे  (प्रतिनिधी) : लष्कर भरती पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या गुन्ह्याचा प्रमुख सूत्रधार असलेल्या लष्कर अधिकाऱ्यास अटक केली आहे. भारतात होत असलेल्या या पेपरचा तोच भरती प्रमुख देखील होता. त्याला सिकंदराबाद येथून पकडले आहे तर त्याच्या साथीदाराला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. भगतप्रितसिंग बेदी असे या लष्कर अधिकाऱ्याचे नाव आहे. तर त्याच्यासोबत… Continue reading पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! लष्कर भरती पेपर फुटी प्रकरणात बडया अधिकार्‍यास अटक

नरंदे येथे तुटलेल्या वीजेच्या तारेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे आज (सोमवार) सकाळी नऊच्या सुमारास शेतामध्ये जाताना रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून रमजान इमाम मुल्लानी (वय 65 ) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नरंदे येथील शेतकरी रमजान मुल्लानी आज सकाळी शेतामध्ये जात होते.… Continue reading नरंदे येथे तुटलेल्या वीजेच्या तारेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू…

error: Content is protected !!