हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील नेज शिवपुरी येथील राजू वसंत जाधव अंदाजे (वय ४०) या सेट्रिंग काम करणाऱ्या इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली. मजले गावच्या हद्दीतील मांग कुडी नावाने ओळखले जाणाऱ्या शेतात ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी यावेळी दीपक जग्गनाथ कांबळे (मर्फी) याला खून झालेल्या ठिकाणावरून संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे.

या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झाला असून मयताचे वडील वसंत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मयत राजू जाधव हा व्यसनी होता. दारू पिण्यासाठी तो तेथे गेला होता. दिपकची बायको आपल्या एकुलत्या मुलासह माहेरीच राहत आहे. हातकणंगले पोलिस अधिक तपास करत आहेत.