कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल (शनिवारी) रात्री लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

मास्क न वापरणारे एकूण २०६ जणांवर कारवाई करून त्यांचेकडून दंड ५३२०० वसूल केला आहे, मोटर वाहन एकूण केसेस ९०७, दंड वसूल १,१५,३००,आयपीसी १८८ नुसार एकूण २३ गुन्हे दाखल केले आहेत. आस्थापना सुरू ठेवणाऱ्यावर एकूण १८ जणांवर कारवाई करून एकूण  ३३,५०० दंड वसुली केली आहे, मॉर्निंग वॉक करणारे एकूण ११९ जणांवर कारवाई करून त्यांचेकडून  ५२९०० दंड वसूल केला. एकूण २३३ वाहने जप्त केली आहेत. सर्व वरीष्ठ अधिकारी,प्रभारी अधिकारी तसेच दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड हे बंदोबस्तावर असून ही कारवाई सुरू राहणार आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर व जिल्ह्यात बंदोबस्ताचे ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला तसेच लॉकडाऊनच्या अनुषंगाने सर्वांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या आहेत.