राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर : २५०० हून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार

मुंबई (प्रतिनिधी) : इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. राज्य सरकारकडूनही नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्यात आले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी वाहन खरेदी आणि नोंदणी शुल्कामध्ये सूट दिली जाणार आहे. याचा फायदा ग्राहक आणि विक्रेता अशा दोघांनाही होणार आहे. त्यासोबतच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर… Continue reading राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर : २५०० हून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार

दिलासा : जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनामुक्त रुग्णांमध्ये मोठी वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १०३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३०२ तर करवीर तालुक्यात २०८ तर हातकणंगले तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३०२, आजरा- ०५, भुदरगड- ३२,… Continue reading दिलासा : जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनामुक्त रुग्णांमध्ये मोठी वाढ

कोल्हापूरचे उपमहापौर सुभाष पाटील यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या माजी उपमहापौर सुभाष श्रीपती पाटील यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते. सुभाष पाटील हे १९८४ साली लक्षतीर्थ वसाहत प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची १९८६ साली महापालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाली होती. मेजर विलासराव पाटील यांचे… Continue reading कोल्हापूरचे उपमहापौर सुभाष पाटील यांचे निधन

शिरोळमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ सायकल यात्रा…

शिरोळ (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस,  खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. ही दरवाढ कमी करून सर्वसामान्य माणसांना न्याय द्यावा या मागणीसाठी शिरोळ तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आज (मंगळवार) शिरोळ येथे सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी शिरोळ तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्यावतीने तहसिलदार अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात… Continue reading शिरोळमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ सायकल यात्रा…

उद्यापासून गारगोटीमध्ये पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून गारगोटीसह अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे. पण गारगोटी येथील दुकानांची शटर्स ओपन होतील या आशेवर असणाऱ्या व्यापारी आणि नागरिकाना पुन्हा आता पाच दिवस कडक लॉकडाउनला सामोरे जावे लागणार आहे. बुधवार (दि.१४) ते रविवार (दि.१८) जुलैपर्यंत गारगोटी परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये आता तिव्र… Continue reading उद्यापासून गारगोटीमध्ये पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन…

इचलकरंजीतील वरदविनायक क्लबला जवाहर कारखान्यातर्फे यांत्रिक बोट प्रदान…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील वरदविनायक बोट क्लबने महापूराच्या काळात सदैव सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात दिला आहे. या क्लबने अडचणीतून मार्ग काढत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. यासाठी मदतीचा हात म्हणून या क्लबला जवाहर साखर कारखान्याच्यावतीने यांत्रिक बोट देण्यात आली असल्याचे आ. प्रकाश आवाडे यांनी सांगितले.  इचलकरंजीचा कबड्डी, खो-खो बरोबरच रोईंग क्रीडा प्रकारातही नावलौकिक होत… Continue reading इचलकरंजीतील वरदविनायक क्लबला जवाहर कारखान्यातर्फे यांत्रिक बोट प्रदान…

रसिका पाटील यांच्या सभापतीपदी निवडीने शिंगणापुरात जल्लोष…

शिंगणापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सदस्यांचे लक्ष लागून राहिलेल्या विषय समित्यांच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. महिला व बालकल्याण समिती, बांधकाम, समाजकल्याण आणि शिक्षण व अर्थ समिती या चार महत्त्वपूर्ण समित्यांच्या सभापतीपदी महिलांना संधी मिळाली. विशेष म्हणजे शिंगणापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या अपक्ष सदस्य रसिका… Continue reading रसिका पाटील यांच्या सभापतीपदी निवडीने शिंगणापुरात जल्लोष…

‘ओपनिंग अप’द्वारे राज्य टप्प्याटप्प्याने होणार अनलॉक..?

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी राज्य सरकार ‘ओपनिंग अप’ हे सूत्र अवलंबणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अहवालावर चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल, अशी बातमी एक वृत्तवाहिनीने दिली आहे.… Continue reading ‘ओपनिंग अप’द्वारे राज्य टप्प्याटप्प्याने होणार अनलॉक..?

ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा ५ मे, २०२१ चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच १४ नोव्हेंबर, २०१४ पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्यात येणार आहेत. तसेच एसईबीसी आरक्षणास स्थगितीपर्यंतच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा मागासर्गीयांप्रमाणे ग्राह्य धरण्यात… Continue reading ईएसबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

‘गरज सरो वैद्य मरो’ हेच ‘बिद्री’च्या सत्ताधारी आघाडीचे धोरण : नाथाजी पाटील (व्हिडिओ)

गारगोटी (प्रतिनिधी) : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याने कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा केला. या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभासाठी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना निमंत्रणच दिले नाही. यावरून सत्तारूढ आघाडीचे ‘गरज सरो व वैद्य मरो’ हे धोरण निदर्शनास येत असल्याची टीका भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री… Continue reading ‘गरज सरो वैद्य मरो’ हेच ‘बिद्री’च्या सत्ताधारी आघाडीचे धोरण : नाथाजी पाटील (व्हिडिओ)

error: Content is protected !!