कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या माजी उपमहापौर सुभाष श्रीपती पाटील यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७२ वर्षांचे होते.

सुभाष पाटील हे १९८४ साली लक्षतीर्थ वसाहत प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची १९८६ साली महापालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाली होती. मेजर विलासराव पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि नात असा परिवार आहे.