कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १०३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३०२ तर करवीर तालुक्यात २०८ तर हातकणंगले तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ३०२, आजरा- ०५, भुदरगड- ३२, चंदगड- ०६, गडहिंग्लज- २०, गगनबावडा – ०२, हातकणंगले – ११५, कागल- ३६करवीर- २०८, पन्हाळा- ७२, राधानगरी- २७, शाहूवाडी – १४, शिरोळ – ६९, नगरपरिषद क्षेत्र- ११२, इतर जिल्हा व राज्यातील- १५ अशा १०३५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ७९, २२० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ६१, ३४४ 

मृतांची संख्या,१११

उपचार सुरु असलेले रूग्ण१२, ७६५