भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचे निधन…

मुंबई (प्रतिनिधी) : माजी भारतीय क्रिकेटर आणि १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या यशपाल शर्मा यांचे आज (मंगळवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यशपाल शर्मा यांनी १९८३ च्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ८९ धावांची धमाकेदार खेळी केली होती. ज्यामुळे भारताने पहिल्याच सामन्यावर विजयाची मोहोर उमटवली होती. तर… Continue reading भारताचे माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचे निधन…

जिल्हा परिषदेच्या चारही समित्यांच्या सभापतीपदाची संधी महिला सदस्यांनाच…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे लक्ष लागून असतानाच सभापती पदासाठीच्या नावावर अखेर शिकामोर्तब झाले. चारही सभापतीपदे महिलांना देण्यात आल्याने विषय समित्यांवर महिलाराज असणार आहे हे निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी काल (सोमवार) पार पडल्या. यानंतर विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने विषय… Continue reading जिल्हा परिषदेच्या चारही समित्यांच्या सभापतीपदाची संधी महिला सदस्यांनाच…

पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांच्या ३६१ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांच्या अधिन राहून समाधीस्थळावरती नगराध्यक्षा रुपाली धडेल, रवींद्र धडेल, सयाजी झुंजार, भिमराव काशिद, भगवान चित्ते यांच्या हस्ते नरवीर शिवा काशिद यांच्या समाधीवर अभिषेक आणि पूजन करणेत आले. यावेळी स्वामीनिष्ठ शिवा काशीद यांच्या जयजयकारांच्या घोषणाही देण्यात… Continue reading पन्हाळा येथे नरवीर शिवा काशिद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजातील उपेक्षित, वंचित, दीनदुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक नागरीकाने या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले. यावेली कोल्हापूर उत्तर विधानसभा… Continue reading शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात : आ. चंद्रकांत जाधव

हेर्ले येथे अतिक्रमणाविरोधात मोर्चा…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील हनुमाननगर आणि सिध्देश्वरनगर या नागरी वस्तीतून डोंगराकडे जाणाऱ्या सरकारी रस्त्यावर गावातील बापू पाटील, किरण पाटील, बाळगोंडा पाटील, आप्पासो पाटील यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढावे यासाठी आज (सोमवार) हर्ले ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी मोर्चा काढला. हेर्ले गावातील हा रस्ता सरकारी असून सुमारे १५० वर्षांपूर्वीपासून या रस्त्यावर वहिवाट आहे. येथे… Continue reading हेर्ले येथे अतिक्रमणाविरोधात मोर्चा…

इचलकरंजीतील व्यापाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित (व्हिडिओ)

इचलकरंजी (प्रतिनिधी) : अत्यावश्यक सेवा सोडून सर्वसामान्य व्यापाऱ्यांची दुकाने गेल्या ९६ दिवसापासून बंद आहेत,गर्दीच्या ठिकाणाहून गर्दी कमी करण्यास प्रशासनास अपयश येत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्र, राजकीय पक्षाचे मेळावे, बाजारातील गर्दी, अत्यावश्यक सेवा देत असलेल्या ठिकाणच्या गर्दीबाबत प्रशासन कारवाईस तयार नसून यातून ५० ते ३०० फुटातील व्यापाऱ्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना फोर्स मागवून… Continue reading इचलकरंजीतील व्यापाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित (व्हिडिओ)

कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर कारचा अपघात : चालकाचा मृत्यू

राशिवडे (प्रतिनिधी) :  कोल्हापूर ते राधानगरी रस्त्यावर खिंडी व्हरवडे ते अनाजे दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव वेगाने टाटा इंडिका (एमएच ०९ बीबी ३००७) ही कार झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये कारचालक जागीच ठार झाला. तर गाडीमधील चार प्रवासी जखमी झालेत. एकनाथ गुंडू पाटील (रा. बटकणंगले ता. हातकणंगले) असे या मृत कारचालकाचे नाव आहे. हा अपघात आज (सोमवार)… Continue reading कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर कारचा अपघात : चालकाचा मृत्यू

जिल्ह्यात चोवीस तासात १९९९ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १९९९ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३१८ तर करवीर तालुक्यात ४३५ तर हातकणंगले तालुक्यात २५० रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३१८, आजरा- १०७, भुदरगड- ५१,… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात १९९९ जणांना कोरोनाची लागण…

लाईव्ह मराठी स्पेशल : शेतकरी संघाला राजकारणाची लागण ! (भाग – २)

कोल्हापूर (सरदार करले) : अत्युच्च शिखरावर असलेल्या शेतकरी सहकारी संघाला तात्यासाहेब मोहिते आणि कार्यकारी संचालक बाबा नेसरीकर यांच्यामुळे आर्थिक स्थैर्य आलेच, शिवाय संघ एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. पण, १९८९ नंतर सर्वोच्च शिखरावर असलेल्या संघावर राजकारण्यांची नजर गेली. राजकीय कुरघोडीतून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ आणले. इथे ‘बैल’ बिथरला. संघात राजकारण घुसले आणि त्यानंतर… Continue reading लाईव्ह मराठी स्पेशल : शेतकरी संघाला राजकारणाची लागण ! (भाग – २)

इचलकरंजी पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी प्रयत्न करणार : तानाजी पोवार

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी पालिकेतून निवृत्त झालेल्या १२५ कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅच्युईटी) मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच दोनशेहून जादा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजेची रक्कमही अजून मिळालेली नाहीये. सफाई कामगारांच्या सुटीच्या पगाराचा मोबदला मागील वर्षापासून मिळालेला नाही. याबाबतचे निवेदन निवृत्त कर्मचारी यांनी तसेच इचलकरंजी नगरपरिषदेकडून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. नगरपालिकेच्या राखीव निधीतून ही… Continue reading इचलकरंजी पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी प्रयत्न करणार : तानाजी पोवार

error: Content is protected !!