कोल्हापुरात प्रथमच ‘सेन्चुरी पाम’ला फुलोरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेंच्युरी पाम या ताडाच्या प्रजातीस सुमारे ८० वर्षांच्या आयुष्यात एकदाच येणारा फुलोरा हा वनस्पतींच्या विश्वामध्ये सर्वाधिक मोठा आणि तितकाच दुर्मीळ फुलोरा म्हणून ओळखला जातो. शिवाजी विद्यापीठाच्या लीड बॉटेनिकल गार्डनमध्येही या प्रजातीचे ताड २४ वर्षांपूर्वी लावण्यात आले असून, यंदा त्या वनस्पतीस मनमोहक फुलोरा आलेला आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ व वनस्पतीप्रेमी यांना हा दुर्मीळ नजारा पाहण्याची ही एक… Continue reading कोल्हापुरात प्रथमच ‘सेन्चुरी पाम’ला फुलोरा

खात्यांतर्गत पोलिसांना २० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे-फडणवीस सरकारने गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना मोठं गिफ्ट दिले आहे. आता कॉन्स्टेबल रॅंकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यापूर्वी ठाकरे सरकारने डीजी लोन ही सुविधा बंद केली होती. ती आता फडणवीसांनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय… Continue reading खात्यांतर्गत पोलिसांना २० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार

कुंभोज येथे टॉवरवर वीज पडून १० टीव्ही संच जळाले

कुंभोज (प्रतिनिधी) : येथे बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बाजारपेठेतील मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने विविध घरांतील १० टीव्ही संच जळाले. यात एक लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले. कुंभोज परिसरात रात्री अचानक वारा व विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. यामध्ये मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने संतोष माळी, विनायक माळी, अमोल कळंत्रे, विश्वनाथ बनणे, रमजान… Continue reading कुंभोज येथे टॉवरवर वीज पडून १० टीव्ही संच जळाले

संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली फडणवीस यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा नेमका तपशील आणि उद्देश अद्याप समजू शकलेला नाही; मात्र या भेटीदरम्यान मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आता संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याची… Continue reading संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली फडणवीस यांची भेट

दाऊद इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तपास यंत्रणेने दाऊदच्या साथीदारांवर देखील बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने या सर्वांविरोधात ३  फेब्रुवारी २०२२ ला गुन्हे दाखल केले होते. यामध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले… Continue reading दाऊद इब्राहिमवर २५ लाखांचे बक्षीस जाहीर

पुण्यात अथर्वशीर्ष पठणामध्ये ३१ हजार महिलांचा सहभाग

पुणे  (प्रतिनिधी) : येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने ऋषिपंचमीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणामध्ये ३१ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर गुरुवारी पहाटे उमटले आणि वातावरण मंगलमय होऊन गेले. कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग… Continue reading पुण्यात अथर्वशीर्ष पठणामध्ये ३१ हजार महिलांचा सहभाग

उत्तर प्रदेशातील गंगा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू

गाझीपूर (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये गंगा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला आहे. इंजिनवर चालणाऱ्या या बोटीमध्ये सुमारे २५-३० लोक बसले होते. बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे २२ जणांचे प्राण वाचवले, मात्र यातील पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. त्याचवेळी नाविकाने उडी… Continue reading उत्तर प्रदेशातील गंगा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

नवी दिल्ली : गगनाला भिडणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपायांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात या महिन्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत इंडेनच्या १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर दरात ९१.५० रुपयांची घट झाली. कोलकात्यात १००, तर मुंबईत ९२.५० रुपयांनी कपात… Continue reading व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

कुंभोज येथे मुस्लिम बांधवांतर्फे गणपतीची प्रतिष्ठापना

कुंभोज (प्रतिनिधी) : येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या सात मित्रांची साई समर्थ तरुण मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना मंडळाचे माजी अध्यक्ष व सदस्य इनुस मुनीर सुतार परिवाराच्या वतीने करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या तरुण मंडळांतर्फे मुस्लिम बांधव गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाचे अध्यक्ष तुषार शिंगे, इनुस सुतार यांच्या माध्यमातून अनेक मुलांनी… Continue reading कुंभोज येथे मुस्लिम बांधवांतर्फे गणपतीची प्रतिष्ठापना

कुरुंदवाड येथे अपूर्व जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात गणेशभक्तांनी येथील पाच मशीद, गणेश मंदिर, विविध संस्था, घराघरात व सार्वजनिक मंडळांत निरनिराळ्या वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत, गुलाल व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत भक्तांनी बाप्पांना घरी आणत गणरायाची आज विधिवत प्रतिष्ठापना केली. राजवाड्यातील संस्थान सरकारच्या दीड दिवसाच्या गणपतीची पालखी मिरवणुकीने श्रीमंत भालचंद्रराव पटवर्धन यांच्या हस्ते प्रतिष्ठापना… Continue reading कुरुंदवाड येथे अपूर्व जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना

error: Content is protected !!