भाजप-मनसे युतीचे संकेत; अमित शाह राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यानच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली होती. या लगोलग भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची त्यांच्या… Continue reading भाजप-मनसे युतीचे संकेत; अमित शाह राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता

पंतप्रधानांकडून युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द

दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला; मात्र प्रत्येक वेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचे एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असे म्हटले जाते; पण आता भारतीय नौदलाच्या नवा ध्वजावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी… Continue reading पंतप्रधानांकडून युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द

बिल गेट्स, आदर पूनावाला यांना हायकोर्टाची नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरातील अनेक देशांना संकटात आणले होते. आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय. या काळात कोरोनामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनावर आलेल्या लसीमुळे बऱ्याच नागरिकांचे प्राण वाचले; पण याच कोरोनाच्या लसीच्या दुष्परिणामामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याचा तिच्या वडिलांनी केला. याप्रकरणी त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात तक्रार दाखल केली… Continue reading बिल गेट्स, आदर पूनावाला यांना हायकोर्टाची नोटीस

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज प्रकरणाची माहिती द्या : मनसे

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कोतोली ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या शाखेमधून आजपर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून किती लोकांना कर्ज प्रकरणे वाटप करण्यात आली, किती कर्जदारांचे मागणी अर्ज आले आहेत व पेंडिंग प्रकरणे कोणत्या कारणाने मागे ठेवली आहेत; याची माहिती मिळावी, अशी मागणी मनसेने केली आहे. यावेळी संदीप शेलार,… Continue reading अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज प्रकरणाची माहिती द्या : मनसे

राज ठाकरेंशी राजकीय चर्चाच झाली नाही : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : ‘सगळीकडे गणपतीचे आगमन झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. त्यांचे मध्यंतरी ऑपरेशन झाले होते. प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन यासाठी मी आलो होतो. आमच्यात राजकीय चर्चाच झाली नाही. त्यामुळे कोणती समीकरणे यातून निघणार?’ असा प्रतिप्रश्न… Continue reading राज ठाकरेंशी राजकीय चर्चाच झाली नाही : मुख्यमंत्री

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र व्हावे : अरविंद काळे

कोतोली (प्रतिनिधी) : मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र म्हणून काम करावे, असे आवाहन पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी केले. ते कोलोली येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात; पण कायद्याचे नियम पाळून साजरा करावा. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल… Continue reading मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र व्हावे : अरविंद काळे

‘पन्हाळा तालुका क्रीडा संकुलासाठी जमीन संपादन त्वरित करा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुका क्रीडा संकुल लवकरात लवकर स्थापन होण्यासाठी आवश्यक ती जमीन मिळवण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात घेण्यात आली. बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, क्रीडा… Continue reading ‘पन्हाळा तालुका क्रीडा संकुलासाठी जमीन संपादन त्वरित करा’

अपूर्व उत्साहात तासगावचा रथोत्सव सोहळा

तासगाव (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध श्री गणपती पंचायतनचा २४३ वा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात झाला. रथोत्सवादिवशी गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपतीचे अलोट गर्दीत विसर्जन करण्यात आले.  ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात, अलौकिक व नयनरम्य सोहळ्यात हा रथोत्सव पार पडला. ‘मोरया’ च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढत होते. गणपती मंदिर ते… Continue reading अपूर्व उत्साहात तासगावचा रथोत्सव सोहळा

विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ. मोरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. डी. के. मोरे यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या बैठकीत डॉ. मोरे बोलत होते. उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे, सी. ए. कोतमिरे, समन्वयक,… Continue reading विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ. मोरे

सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर बसलात : रामदास कदम

मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या अडीच वर्षांत तीनदा मंत्रालयात आले होते. यासाठी त्यांची गिनीज बुकामध्ये नोंद झाली आहे. सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा तुम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का?, असा सवाल एकनाथ शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… Continue reading सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर बसलात : रामदास कदम

error: Content is protected !!