आळते येथे श्री किसान सेंद्रिय भाजीपाला खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कसबा आळते येथे आर्ट ऑफ लिव्हींग परिवार यांच्या श्री श्री किसान मंच सेंद्रिय भाजीपाला खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन खंडेराव मिरजकर, महेश हिरवे,शशिकांत पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. हे सेंद्रिय भाजीपाला खरेदी विक्री केंद्र उघडण्याचा मूळ उद्देश म्हणजे किटकनाशक आणि रासायनिक खताच्या अति वापरामुळे माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम… Continue reading आळते येथे श्री किसान सेंद्रिय भाजीपाला खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन…

पंत वालावलकर हायस्कूलमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठया उत्साहाने संपन्न झाली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ शिक्षक संजय सौंदलगे तर लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस सुरगोंडा पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमुख्याध्यापक बी. ए. लाड… Continue reading पंत वालावलकर हायस्कूलमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

मिरजकर तिकटी येथे थुंकीमुक्त कोल्हापूरचे जनजागरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बी वॉर्ड अनांन्य निवारण कृती समितीचे वतीने आज (शुक्रवार) मिरजकर तिकटी येथे थुंकीमुक्त कोल्हापूर व्हावे यासाठी प्रबोधन करण्यात आले. यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरीकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी किसन कल्याणकर, राहुल चौधरी, रामेश्वर पत्की, डॉ. गुरुदत्त म्हाद्गुत, सचिन जाधव, पृथ्वीराज जगताप, सतीश पोवार, अशोक लोहार, प्रशांत बरगे आदी उपस्थित होते.

उद्या भुदरगड तालुका सकल मराठा समाजाची संघर्ष यात्रा…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण बचाव संघर्ष यात्रा उद्या (शनिवार) आयोजित करण्यात आली असून या यात्रेत खा. राजे संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यात विविध मार्गाने आंदोलन होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भुदरगड तालुका सकल… Continue reading उद्या भुदरगड तालुका सकल मराठा समाजाची संघर्ष यात्रा…

महात्मा गांधी जंयतीनिमित्त गणेश तरुण मंडळाचा अभिनव उपक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून गणेश तरुण मंडळाच्या वतीने कपिलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच नागरिकांना ओला आणि सुका कचरा घरातच वेगळावेगळा करण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रकाचे प्रभागातील महिला कर्मचारी आणि सहभागी स्वयंसेवकांच्या हस्ते वाटण्यात आले. यावेळी दीपा ठाणेकर, अनुराधा गोसावी,  धर्माधिकारी,  झिरळे, उर्मिला ठाणेकर, संतोष गोसावी, शुभंकर गोसावी, ओंकार… Continue reading महात्मा गांधी जंयतीनिमित्त गणेश तरुण मंडळाचा अभिनव उपक्रम…

जि.प.मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती आज (शुक्रवार) जिल्हा परिषदमध्ये साजरी करण्यात आली.  आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आज सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी जि.प.कोल्हापूर… Continue reading जि.प.मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात

आरक्षणासाठी आत्महत्या हा पर्याय नाही : दिलीप पाटील (व्हिडिओ)

मराठा आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या करू नये असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे दिलीप पाटील यांनी केले.  

जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३०९ जण कोरोनाबाधित; ४६५ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ३०९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४६५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६८३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८ वा.… Continue reading जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३०९ जण कोरोनाबाधित; ४६५ जण कोरोनामुक्त

पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे,गणेश बिराजदार नागपूरचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरच्या पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे आणि इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक उपअधीक्षक गणेश बिराजदार यांची नागपूर शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने काल (बुधवार) रात्री उशिरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने तीन पोलीस उपअधीक्षक यांची नेमणूक झाली आहे. यामध्ये रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांची… Continue reading पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे,गणेश बिराजदार नागपूरचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त

मोबाईल व रक्कम घेऊन पसार झालेल्या एकास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील केर्ली येथील अभिजीत पारळे या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि १ हजार रुपये लुटून पसार होणाऱ्या एका तरुणाला जुना राजवाडा पोलीसांनी आज (गुरुवार) अटक करण्यात आली. सागर अजित गवंडी (वय २६, रा. ताराराणी कॉलनी, मैल खड्ड्याजवळ) असे या लुटारूचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.… Continue reading मोबाईल व रक्कम घेऊन पसार झालेल्या एकास अटक

error: Content is protected !!