कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ३०९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४६५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६८३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ७६, आजरा तालुक्यातील ४,  भूदरगड तालुक्यातील १४,  चंदगड तालुक्यातील ६,  गडहिंग्लज तालुक्यातील १०,  हातकणंगले तालुक्यातील २४,   कागल तालुक्यातील ५, करवीर तालुक्यातील ४३, पन्हाळा तालुक्यातील १४, राधानगरी तालुक्यातील ६,  शाहूवाडी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १९,  इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ६३,   आणि इतर २४ अशा एकूण ३०९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान तब्बल १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या : ४४,७४३.

एकूण डिस्चार्ज मिळालेले : ३४,५२९.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ८७६०.

एकूण मृत्यू : १४५४.