कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून गणेश तरुण मंडळाच्या वतीने कपिलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच नागरिकांना ओला आणि सुका कचरा घरातच वेगळावेगळा करण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रकाचे प्रभागातील महिला कर्मचारी आणि सहभागी स्वयंसेवकांच्या हस्ते वाटण्यात आले.

यावेळी दीपा ठाणेकर, अनुराधा गोसावी,  धर्माधिकारी,  झिरळे, उर्मिला ठाणेकर, संतोष गोसावी, शुभंकर गोसावी, ओंकार गोसावी, पार्थ शेट्ये, अर्जुन घोरपडे, बंटी घोरपडे, मार्केट मुकादम लखन, आरोग्य मुकादम सिकंदर बनगे, कर्मचारी उपस्थित होते.