कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील केर्ली येथील अभिजीत पारळे या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि १ हजार रुपये लुटून पसार होणाऱ्या एका तरुणाला जुना राजवाडा पोलीसांनी आज (गुरुवार) अटक करण्यात आली. सागर अजित गवंडी (वय २६, रा. ताराराणी कॉलनी, मैल खड्ड्याजवळ) असे या लुटारूचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभिजीत पारळे, हा बुधवारी घरगुती कामानिमित्त कोल्हापुरात आला होता. तो शिवाजी पेठेतील एका महाविद्यालय जवळ लघुशंकेसाठी थांबला असता, एका तरुणाने त्याच्याकडील किमती मोबाईल जबरदस्तीने पळून नेला होता. पारळे याने त्या तरुणाच्या पाटलाग करून त्याला नाळे कॉलनी जवळ गाठले होते. मात्र त्या तरुणाने पारळे यांना मारहाण करून त्याच्याकडील १००० रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी अभिजीत पारळे यांने जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आज याप्रकरणी सागर गवंडी याला अटक केली.