हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कसबा आळते येथे आर्ट ऑफ लिव्हींग परिवार यांच्या श्री श्री किसान मंच सेंद्रिय भाजीपाला खरेदी-विक्री केंद्राचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन खंडेराव मिरजकर, महेश हिरवे,शशिकांत पिसे यांच्या हस्ते करण्यात आले.

हे सेंद्रिय भाजीपाला खरेदी विक्री केंद्र उघडण्याचा मूळ उद्देश म्हणजे किटकनाशक आणि रासायनिक खताच्या अति वापरामुळे माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यासाठी विशमुक्त भाजीपाला आणि अन्नधान्य काळाची गरज बनली आहे. सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा. ग्राहकाला किफायतशीर किंमतीमध्ये सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध व्हावा. यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आल्याचे केंद्राचे प्रमुख शितल हावळे यांनी सांगितले.

यावेळी संदिप पाटील, अमोल चौगुले, बाळासो संकाण्णा, बाळासो कुंभोजे, विकास टारे, सचिन पाटील, शितल शेटे, गुंडू मजलेकर, गुंडू पाटील आदी उपस्थित होते.