कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती आज (शुक्रवार) जिल्हा परिषदमध्ये साजरी करण्यात आली.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आज सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी जि.प.कोल्हापूर यांच्या हस्ते फोटोंचे पुजन करण्यात आले. तसेच यावेळी संजय अवघडे कक्ष अधिकारी, नारायण चांदेकर अधीक्षक, आबा कदम, प्रशांत नलवडे वरिष्ठ सहाय्यक उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची संपूर्ण माहिती बी.पी. माळवे यांनी सांगितली. या प्रसंगी मर्यादित संख्येने अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून जयंती साजरी केली.