कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठया उत्साहाने संपन्न झाली.

यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ शिक्षक संजय सौंदलगे तर लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस सुरगोंडा पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमुख्याध्यापक बी. ए. लाड यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांचा जीवनपट आणि संघर्ष कहाणी उलगडून दाखवली. तर सागर मनुगडे यांनी अहिंसा आणि आपण या विषयावर विवेचन केले.

यावेळी प्रशांत भोसले, सुरेखा पोवार, मृदुला शिंदे, गायत्री तपाकिरे, विमल धायगुडे, शबनम मनियार, सरिता पोवार, सौ. जमादार, नामदेव आगळे आदी मान्यवर उपस्थित होते.