शालेय प्रशासनास धमकी देणाऱ्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा निषेध (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, त्यांच्या मिळकतीची सीबीआय चौकशी करा, शालेय प्रशासनास धमकी देणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणांच्या निनादात आज (गुरुवार) जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शैक्षणिक संघटनांच्या वतीने जिल्हापरिषद येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांकडे वर्ग करणे, यासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य या प्रशासकीय घटकांना माहिती… Continue reading शालेय प्रशासनास धमकी देणाऱ्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा निषेध (व्हिडिओ)

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून केवळ ८ दिवसात आयसोलेशनमध्ये जनरेटरची सोय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशनच्या कोविड केअर सेंटरसाठी ५ लाखांचा जनरेटर देण्याच्या घोषणेला आठवडा होतो न होतो, तोच प्रत्यक्षात आयसोलेशमध्ये आज (गुरुवार) जनरेटर कार्यान्वीत झाला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये लोकसहभागातून विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ… Continue reading श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून केवळ ८ दिवसात आयसोलेशनमध्ये जनरेटरची सोय

मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा : खासदार संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात असंतोषाचे पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडमधील एका तरुणाने आत्महत्या केली. यावर ‘मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा असून, हतबल होऊन तुम्ही आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटेल काय? त्यामुळे कोणत्याही बांधवांनी आत्महत्या करु नये.’ असे भावनिक आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे केले… Continue reading मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा : खासदार संभाजीराजे छत्रपती

फेरीवाल्यांच्या हक्काच्या कर्जात अडथळा करू नका : भाजपा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने केंद्र शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊननंतर समान्य नागरीकांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता केंद्र शासनाने विविध आर्थिक पॅकेजेची घोषणा केली. यामध्ये हातावर पोट असणार्‍या फेरीवाल्यांकरीता पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत बँकांमार्फत १०००० तातडीने कर्ज देण्याची योजनाही आहे. या योजनेची सुरूवात जुलै २०२० मध्ये झाली आहे. परंतु या योजनेसाठी पात्र फेरीवाल्यांना हे कर्ज उपलब्ध करून… Continue reading फेरीवाल्यांच्या हक्काच्या कर्जात अडथळा करू नका : भाजपा

२ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी व्यवस्थापकाला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरीतील एका फुटवेअर कंपनीमध्ये साहित्याची परस्पर विक्री करून २ लाख ३ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी, व्यवस्थापक राजेंद्र दत्तात्रय सावंत (वय ३२ रा. हरिपूररोड, सांगली) याला राजारामपुरी पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी विभागीय व्यवस्थापक पार्थ संजय महेश्वरी (वय २४ रा. मकराना, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीला आज (गुरुवार) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने… Continue reading २ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी व्यवस्थापकाला अटक

चिथावणी देत असाल तर याद राखा..! (व्हिडिओ)

आरक्षणाच्या गोंधळात परीक्षा घेऊन मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा मराठा समाज गप्प बसणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने देण्यात आला.  

…तर परीक्षा केंद्र फोडू ! : सचिन तोडकर (व्हिडिओ)

मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारने upsc, mpsc च्या परीक्षा घेतल्यास परीक्षा केंद्र फोडण्याचा इशारा सचिन तोडकर यांनी दिला.  

…अन्यथा ६ ऑक्टोबरला ‘मातोश्री’वर आंदोलन : आबा पाटील (व्हिडिओ)

मराठा आरक्षणाबाबत ५ ऑक्टोबरपर्यंत सकारात्मक ठोस भूमिका जाहीर न केल्यास ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबा पाटील यांनी दिला.  

..अन्यथा एसटी विभागीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार : विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे देशातील सर्वच उद्योगधंदे, सरकारी कामकाज ठप्प होते. यामुळे अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे ३ महिन्याचे पगार रखडले आहेत. त्यामुळे एसटी कामगारांचे ३ महिन्यांचे पगार जर ७ ऑक्टोबरपर्यंत दिले नाहीत, तर महाराष्ट्रभर विभागीय कार्यालयाच्या दारात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे. याबाबतची… Continue reading ..अन्यथा एसटी विभागीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार : विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील

ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इयत्ता बारावीच्या पुर्नरचीत अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा आणि त्या अनुषांगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी ८ ऑक्टोबपर्यंत मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत… Continue reading ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

error: Content is protected !!