झोकून दिल्यास करिअर उज्ज्वल : भरत ओसवाल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कोणत्याही क्षेत्रात झोकून दिल्याखेरीज करिअरमध्ये यशस्वी होता येत नाही,’ असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले. येथील शासकीय तंत्रनिकेतन, हस्तकला विभाग व वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने फॅशन ज्वेलरी आणि मेटलवेअर कास्टिंग टेक्निशियन या दोन अभ्यासक्रमांचे उदघाटन भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सेंटर ऑफ एक्सलन्स… Continue reading झोकून दिल्यास करिअर उज्ज्वल : भरत ओसवाल

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून डॉक्टर, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधींना ही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आज (शुक्रवार) ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह  आल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी ट्विटरवरून  दिली आहे. तर आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घेण्याचे आवाहन… Continue reading ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

सूर्या हॉस्पिटलवर ५ हजार रुपयांचा दंड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड कचरा (बायोमेडिकल वेस्ट ) रस्त्यावर उघडयावर ठेवल्याबददल महापालिकेच्या पथकाने येथील सूर्या हॉस्पिटलवर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. येथील सूर्या हॉस्पिटलने कोविड कचरा (बायोमेडिकल वेस्ट ) रस्त्यावर आणून उघडयावर ठेवला असल्याची ऑनलाईन माहिती महापौर निलोफर आजरेकर यांना मिळाली.  त्यानुसार महापौर निलोफर आजरेकर यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या पथकाला पाहणी करुन कारवाई करण्याचे… Continue reading सूर्या हॉस्पिटलवर ५ हजार रुपयांचा दंड

एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील एसटीची वाहतूक आजपासून पूर्ण आसन क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर आगारातून आज (शुक्रवार) सकाळपासून एसटी पूर्ण आसन क्षमतेने धावण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क शिवाय एसटीमध्ये कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जात नाही. राज्यात मार्चपासून कोरोनामुळे पूर्णपणे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर लाॅकडाऊन शिथिल… Continue reading एसटी पूर्ण क्षमतेने धावणार पण ‘ही‘ अटी लागू

परीख पुलाजवळील दुचाकी लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मध्यवर्ती मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील परीख पुलाजवळ असणाऱ्या जेम्स स्टोन बिल्डिंगच्या पार्किंगमधून एक मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पराग मिलिंद उगार (वय 23 रा. शुक्रवार पेठ) यांने अज्ञात चोरट्यांनी विरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पराग उगार हा घरगुती कामानिमित्त परीख पुलाजवळील जेम्स स्टोन या बिल्डिंगमध्ये… Continue reading परीख पुलाजवळील दुचाकी लंपास

ह्दया कोविड रूग्णालयाचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील हृदया कॅन्सर सेंटरमध्ये कोव्हिड रूग्णालय सुरू करण्यात आले. त्यांचे उदघाटन शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते फित कापून झाले. रूग्णालयामुळे परिसरातील कोरोना बाधित रूग्णांच्यावर उपचार करण्यासाठी सोय झाली आहे, असे सांगून उपस्थित डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.  डॉ. सुरेखा चौगुले यांनी रूग्णालयाची माहिती… Continue reading ह्दया कोविड रूग्णालयाचे उद्घाटन

भाजपतर्फे मोफत नेत्र चिकित्सा, मोफत चेष्मे वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सुरु आहे. यामध्ये आज (शुक्रवार) घेण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चेष्मे वितरण कार्यक्रमास उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या… Continue reading भाजपतर्फे मोफत नेत्र चिकित्सा, मोफत चेष्मे वितरण

झेडपीच्या १५ वित्त आयोगाच्या निधी वितरणाला ब्रेक

कोल्हापूर(प्रतिनिधी): जिल्हा परिषदेमधील पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी मनमानी केली आहे. त्यामुळे माजी बालकल्याण सभापती वंदना मगदूम यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. यावर ब्रेक बसला असल्याचे त्यांनी काल सांगितले. गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून वादंग झाला होता. सभा ऑनलाईन असल्यामुळे सदस्यांना विश्वासात न घेता निधीचे वाटप… Continue reading झेडपीच्या १५ वित्त आयोगाच्या निधी वितरणाला ब्रेक

कोरोनामुळे ‘इतक्या’ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित (व्हिडिओ)

कोरोनामुळे सहकारी संस्था, नागरी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे गोकुळ, जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील १२०० ते १३०० सहकारी संस्थांच्या विद्यमान संचालकांनाच पुन्हा मुदत वाढ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.  

महापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक असून गेल्या तीन दिवसात पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनी २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड केला असल्याची माहिती आयुक्त्‍ डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व्यापक उपाययोजना प्रभावीपणे राबवित आहे. आयुक्त डॉ. कलशेटटी म्हणाले की, कोरोनाचा प्रसार… Continue reading महापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त

error: Content is protected !!