कोल्हापूर (प्रतिनिधी) : मध्यवर्ती मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील परीख पुलाजवळ असणाऱ्या जेम्स स्टोन बिल्डिंगच्या पार्किंगमधून एक मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पराग मिलिंद उगार (वय 23 रा. शुक्रवार पेठ) यांने अज्ञात चोरट्यांनी विरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पराग उगार हा घरगुती कामानिमित्त परीख पुलाजवळील जेम्स स्टोन या बिल्डिंगमध्ये बुधवारी सायंकाळी गेला होता. त्यावेळी त्याची या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये लावलेली सुमारे २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल क्रमांक एम. एच. झिरो नाईन ए डब्ल्यू 30 ही चोरट्यांनी लंपास केली. मोटर सायकल चोरीला गेल्याचे निदर्शनास येतात पराग उगार याने मोटर सायकलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटरसायकल मिळून न आल्यामुळे त्याने आज (शुक्रवारी) अज्ञात चोरट्यांनी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.