कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सुरु आहे. यामध्ये आज (शुक्रवार) घेण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चेष्मे वितरण कार्यक्रमास उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.

या उपक्रमास जवळपास २५० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती दर्शवून नेत्र तपासणी करून घेतली. तर पहिल्या २५ व्यक्तींना चष्मे प्रदान करण्यात आले. यासाठी लायन्स आय हॉस्पिटल, कोडोली येथील डॉ. सागर येझरे व सविता येझरे यांनी नेत्र तपासणीसाठी आलेल्या लोकांचे नेत्र तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी चष्मे वितरण कार्यक्रम प्रमुख हेमंत आराध्ये, प्रग्नेश हमलाई, सुजाता पाटील, डॉ.राजवर्धन, संजय जासूद, धीरज पाटील, आशिष कपडेकर, बापू राणे, दिलीप बोंद्रे, बाळासाहेब ऐवळे, माणिक बाकळे, ओंकार घाटगे, अतुल चव्हाण, निखील मोरे, सतीश वेटाळे, मामा कोळवणकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, अमोल भोसले, मानसिंग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी आदी मान्यवरांनी यांनी भेट दिली.

याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा गायत्री राउत, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डीकर, शोभा भोसले, स्वाती कदम, राधीका कुलकर्णी, कार्तीकी सातपुते, श्वेता कुलकर्णी, मयुरी पोहाळकर, सुप्रिया धुमाळ व इतर पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.