कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून डॉक्टर, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधींना ही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आज (शुक्रवार) ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह  आल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी ट्विटरवरून  दिली आहे.

तर आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घेण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम असल्याचे ही मुश्रीफ यांनी ट्विट करून सांगितले आहे.