कपिलेश्वर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण आणि अन्य राज्यभरातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र आदमापूर आहे. सद्गुरू बाळूमामा देवालयाच्या नुतन विश्वस्त मंडळाने याचा पदभार स्विकारला.

नूतन कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी जुने विश्वस्त मंडळापैकी मानद अध्यक्ष धैर्यशील शिवाजी भोसले, सरपंच विजय गुरव, पोलीस पाटील माधुरी पाटील, या पदसिद्ध विश्वस्थांसह उर्वरित नऊ सदस्यांना पदभार स्विकारणेसाठी बाळुमामा देवालयात निमंत्रित करून त्यांना पदभार दिला.

पुंडलिक हणमाप्पा होसमणी, रामाण्णा तिमाप्पा मरेगुद्री, तमन्ना मासरेड्डी, लक्ष्मण बाबुराव होडगे, शिवाजी लक्ष्मण मोरे, गोविंद दत्तू पाटील, भिकाजी बापू शिणगारे, आप्पासाहेब बाबुराव पुजारी असे नवीन विश्वस्त आहेत. त्यांचे नूतन कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी या सदस्यांचे अभिनंदन केले.

यावेळी सरपंच विजय गुरव, माजी सरपंच एम.डी. पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष एल.जी. पाटील, एस. के. पाटील, नामदेव पाटील, युवराज पाटील, अमेय पाटील, समीर पाटील, शिवकुमार पाटील, अनिल पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.