कसबा बावडा ( प्रतिनिधी ) – डी वाय पाटील अभियांत्रिक महाविद्यालय कोल्हापूरच्यावतीने बारावी नंतरच्या करियर संधी आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबात मार्गदर्शक ठरणाऱ्या DYPCET PODCAST चा शुभारंभ डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाला. अशाप्रकारचे पॉडकास्ट सुरू करणारे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय विभागातील पहिलेच अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.

बारावी परीक्षा दिलेल्या आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना करिअर व प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळावी या या उद्देशाने हे पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. या पॉडकास्टचे एकूण चार भाग असून पहिल्या भागात बारावीनंतरच्या विविध करिअर संधी, अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या विविध महाविद्यालयांची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या भागात अभियांत्रिकी मधील विविध शाखा व त्यामध्ये असलेल्या विविध करिअर संधी याबाबत मार्गदर्शन असून तिसऱ्या भागात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात ‘कॅप 2024’ बद्दल सविस्तर माहिती, मागील वर्षाचा कट ऑफ याबाबतची माहिती देण्यात आली आहे. चौथ्या भागात इंजिनिअरिंगसाठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, आवश्यक कागदपत्रे, प्रवेश घेताना शाखा महत्त्वाची की महाविद्यालय याबाबत डॉ. गुप्ता यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय असून गेल्या 40 वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी महाविद्यालयाची ओळख आहे. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी नेहमीच तंत्रज्ञान पूरक उपक्रम राबवले जातात. सध्या युट्यूब, इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्याचा वाढता वावर लक्षात घेऊन या पॉडकास्टचा प्रारंभ करण्यात आला आहे. विद्यार्थ्यानाच्या करिअरला दिशा देण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी या नव्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. युवा वर्गाची रुची व गरज ओळखून पॉडकास्ट सुरु केल्याबद्दल त्यानी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. अभियांत्रिकीबाबतची परिपूर्ण माहिती या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, ऍडमिशन विभाग प्रमुख प्रा. रवींद्र बेन्नी, टी.पी.ओ. मकरंद काइंगडे, प्रा. एस. आर. खोत, डॉ. राहुल पाटील, प्रा. मनजित जाधव, प्रा. तिलोत्तमा पडवळे, प्रा. सनी मोहिते, प्रा. शमीम भाई, विराज पसारे, अमृता भोसले, प्रांजल फराकटे, योगेश चौगुले आदी उपस्थित होते. स्पृहा गद्रे, निलेश तरमुरे, जुनेद पटेल यांनी या ‘पॉडकास्ट’ साठी विशेष योगदान दिले.