मासिक पाळी ही महिलांसाठी एक श्राप पेक्षा कमी नसते, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण त्या काळात महिलांना अनेक दिव्यातून सामोरे जावे लागते. शारीरिक त्रासांसोबाबत त्यांना मानसिक त्रासांना सुद्धा सामोरे जावे लागत असते . विशेषतः कोणतेही धार्मिक कार्य असेल किव्हा कोणतेही कार्यक्रम असेल तेव्हा महिलांना या सगळातून पूर्णपणे बाजूला केलं जात. त्यांना ना कशाला हाथ लावून दिले जाते ना देवाची पूजा करून दिली जाते. ना त्यांना मंदिरामध्ये जाण्याची परवानगी असते . महिलांना त्या काळात अशुद्ध मानलं जात. त्या दिवसांत महिलांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते. पण जसे जसे लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार वाढत चालला तसा थोडा फार लोकांमध्ये बदल होत गेला आहे. पण भारतात एक असे मंदिर आहे जिथे महिलांच्या पाळीच्या काळात त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातो फक्त प्रवेशच नाही तर महिलांना पूजा देखील करून दिली जाते. तर चला तर मग जाऊन घेऊयात या मंदिराबद्दल..!

मासिक पाळीतही महिलांना या मंदिरात पूजा करण्याची परवानगी

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे असलेल्या मां लिंग भैरवी मंदिरात महिला त्यांच्या मासिक पाळी दरम्यान पूजा करू शकतात. लिंग भैरवी कोईम्बतूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.हे मंदिर सद्गुरू जग्गी वासुदेव आश्रमात आहे.

हे तामिळनाडूच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची विशेष गोष्ट सांगायची झाली तर मंदिराच्या आतील गाभाऱ्यात फक्त महिलांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे हे मंदिर महिलांसाठी खास आहे.

या मंदिरात पुजारी म्हणून फक्त महिला आहेत. मात्र, येथे केवळ स्थानिकच नाही तर परदेशी महिलाही मंदिराचे व्यवस्थापन करताना दिसतील. येथे केवळ महिलाच मंदिराची देखभाल करतात.

या महिला पुजाऱ्यांना मंदिरात ‘भैरागिणी माँ’ असे म्हणतात. भैरवी मंदिरात दर पौर्णिमेला दिवसरात्र देवीची मोठी मिरवणूक निघते. ते पाहण्यासाठी लांबून लोक येतात. महिला आणि पुरुष दोघांनाही या मंदिरात जाण्याची परवानगी आहे.