कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेले महावितरणचे कर्मचारी अविनाश अडगाणे (वय ३०) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी अजित हनुमंत लमकाने (रा. शिवनाकवाडी) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश अडगाणे हे महावितरणचे कर्मचारी असून अजित लामकाने यांच्या थकीत वीज बिलासाठी त्यांना विचारणा केली असता आता मी आता भरणार नाही दोन दिवस थांबा. असे म्हणून अंगावर धावून जाऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.

याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले बसंतलाल दूधबर्वे यांनाही धक्काबुक्की करून धमकी दिल्याप्रकरणी अजित लामकाने याच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.