कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीने छापेमारी केली असून 2 मे रोजी पहाटे ते 3 मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या या कारवाईत सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पुणे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार बोगस पॉन्झी / मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या नावाखाली सामान्य लोकांना फसवत सुमारे 100 कोटी पेक्षा जास्त रुपये उकळले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विनोद खूटे हा संशयित फरार असून त्याचा तपास सुरू आहे.

2 मे 2024 रोजी पहाटे ईडीच्या आठ – आठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या दोन पथकांनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत कोल्हापुरातील पार्वती टॉकीज येथील कार्यालय आणि उचंगाव येथील संशयिताच्या घरी एकाच वेळी छापेमारी केली. ज्याच्यामध्ये विनोद तुकाराम खुटे याच्याशी संबंधीत एका व्यवसायकाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने केलेल्या तपासामध्ये आरोपी विनोद तुकाराम खुटे हा विविध ठिकाणी लोकांटी फवसणूक केल्याचे स्पष्ट झाले असून हा संशयित सध्या दुबईत वास्तव्यास असून खुटे हाच मास्टरमाईड असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.


व्हीप्स प्रकरणात कोल्हापुरातून आणखी कोणाची उचल बांगडी होणार का ?

ईडीने दिलेल्या माहितीनुसार बोगस योजना, बेकादेशीर व्यापार अशा प्रकारचे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल असून या संबंधाने तपास सुरू आहे सध्या मुख्य आरोपी विनोद खोटे याचे विविध बँकेतील बॅलन्स त्याच्या नातेवाईकांची भारत आणि दुबईतील स्थावर मालमत्तेचा तपास सुरू असून सध्या या प्रकरणात विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे ,अजिंक्य बडादे आणि काही अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून यात अटक व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हीप्स प्रकरणात कोल्हापुरातून आणखी कोणाची उचल बांगडी होणार का ? असा सवाल आता दबक्या आवाजात विचारला जात आहे.

निवडणूकीसाठी आलेल्या पैशावर छापेमारीमारी ?

यातच छापेमारी झालेला व्यक्ती कोल्हापुरातील एका बड्यानेत्याचा निकटवर्तीय समजला जात आहे. यातच निवडणूकीसाठी आलेल्या पैशावर छापेमारीमारी करण्यात आली आहे का ? असा सवाल विचारला जात आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात यावरुन खमंग चर्चा सुरु आहे. अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने कोल्हापुरातील विविध ठिकाणी छापेमारी केली आहे.