मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकेमकांवर आरोप करत आहे. अनेक तोफ डागत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यावर अनेक नेत्यांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच या मुलाखतीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींची खरपूस समाचार घेतली. मोदींनी जो स्वतःच कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार अशी टीका केली होती. मोदींच्या या आरोपांना पवारांनी उत्तर दिल्यानंतर राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मिस्टर मोदींनी दोन दिवस बारामतीत येऊन राहावं आणि अभ्यास करावा. कुटुंबाकडे फार सकारात्मक दृष्टीने पहावं आणि मग स्वतःचा कुटुंबा कुठे आहे हे शोधावं, असा टोला राऊतांनी मोदींना हाणला.

काय म्हणाले संजय राऊत..?

मोदींनी शरद पवार यांच्यावर कुटुंब सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार, अशी टीका केली होती. त्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतला. मिस्टर मोदींनी दोन दिवस बारामतीत येऊन राहावं आणि अभ्यास करावा. कुटुंबाकडे फार सकारात्मक दृष्टीने पहावं आणि मग स्वतःचा कुटुंबा कुठे आहे हे शोधावं, असा टोला राऊतांनी मोदींना हाणला.

राऊत पुढे म्हणाले, शरद पवारांचा कुटुंब हे मजबूत एक संघ आहे तुम्ही एका दुसऱ्या माणूस त्यांच्या कुटुंबात दहशतीच्या बळावर फोडला असेल तुरुंगाचे भय दाखवून आणि तो पळून गेला असेल याचा अर्थ कुटुंब फुटला असं नाही.पवारांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार कुटुंब नाही पुऱ्या महाराष्ट्रातील अनेक घर हे त्यांचे कुटुंब आहेत. ठाकरे परिवारातील आम्ही सगळे एक कुटुंब आहोत हे त्यांना नरेंद्र मोदी यांना कळणार नाही कारण त्यांचा कुठं कुटुंबाशी संबंध आला, अशी खोचक टीका राऊतांनी केली.