आमच्या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेकजण शासनाच्या जाचक नियमामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा जिल्हा आणि शहर मंडप असोसिएशनचे पदाधिकारी आणि ‘आम्ही रथवाला’ कमिटीच्या तालुकाध्यक्षांनी दिला.