पुणे : प्रतिनिधी : आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. निलेश लंके यांनी आज पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार गटाकडून पत्रकार परिषद घेतली. यावेळी निलेश लंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत घरवापसी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गटाचे आमदार निलेश लंके यांनी आज, गुरुवारी सायंकाळी पुण्यामध्ये शरद पवार गटात प्रवेश केला. तर  शरद पवार यांच्या हस्ते निलेश लंकेंच्या कोविड या पुस्तकाचे प्रकाशन  शरद  पवार  यांच्या हस्ते झाले असून निलेश लंके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेवरच मी चालतो, असे म्हटले. मात्र, शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याचं स्पष्टपणे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे, लंकेचं नेमकं काय चाललंय, असा प्रश्न कायम आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयात निलेश लंके पोहोचले होते, तर वसंत मोरे यांनीही नुकतेच शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निलेश लंकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लंकेंचा निर्धार पक्का असून ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, असे समजते.  

आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्याबरोबर बुधवारी (दि १३) चर्चा झाली. त्यांनी महायुतीमधील मंत्रीमहोदयांबाबत तक्रार केली. त्यासाठी लवकरच लंके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपण बैठक घेणार आहे. यावेळी संबंधित मंत्रीमहोदयांना देखील बोलावून त्यांच्यात आपसात झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे चुकीचे काही न करण्याबाबत लंके यांना सूचित केले आहे. आता ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत.  त्यांना पक्षाचा व्हीप लागू झाला आहे.  त्यांना वेगळी भूमिका घ्यायची झाल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन करावे लागेल, अशी सध्याची परिस्थिती असल्याचं अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. मात्र, निलेश लंकेंनी शरद पवार यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत घरवापसी केली.