मुंबई – सध्या देशात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर वैयक्तिक खालच्या थराला जाऊन जहरीली टीका करत आहेत. जातीवरून टीका सुरु असतानाच आता ही टीका वर्णभेदावर येऊन पोहचली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान असे म्हणत उद्धव ठाकरे हल्लाबोल केला होता. यावर माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगलेच संतापले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार करत म्हणाले, मोदीजी माझ्याशी लढा. माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही कुठे पण राहा. तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणत PM मोदींवर हल्लबोल चढवला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे..?

उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदीजी माझ्याशी लढा. माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही कुठे पण राहा. तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले होतात तुम्ही, बाळासाहेबांच्या नकली मुलाला मी विचारात आहे. नकली?” हा माझा अपमान नाही, तर देवतासमान माझी आई आणि माझे वडील बाळासाहेब यांचा अपमान आहे. मोदी तुम्ही संस्कारी नसाल तर पण मी सुसंस्कृत घरातून आलो आहे. मला त्याचा अभिमान आहे, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात मोदींवर केला.

ठाकरे पुढे म्हणाले, “तुम्ही नोटबंदीच्या वेळी तुमच्या आईला रांगेत उभं केलं होतं. 90 वर्षांच्या माऊलीचा वापर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केला. तेवढा मी निर्देयी नाही. कारण ‘मातृदेव भव:’ आणि पितृदेव भव:’ हे माणणारं आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका, बाळासाहेब म्हणायच्या आधी हिंदुहृदयसम्राट म्हणायला शिका. नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो. तुम्हाला हिंदुहृदयसम्राट म्हणायला जमत नसेल तर ते महाराष्ट्राची जनता तुम्हाल शिकवेल”, असेही ते म्हणाले. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

काय म्हणाले PM मोदी..?

PM मोदी म्हणाले , काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातले लोक अरबमधील लोकांसारखे दिसतात. मी जरा बाळासाहेब ठाकरेंचे नकली शिवसेनेचे पुत्र आहेत, त्यांनी जरा बाळासाहेबांना आठवावं. मला बाळासाहेंबांच्या नकली मुलाला विचारायचं, त्यांचे मेंटॉर वयोवृद्ध नेत्यालाही विचारायचंय की, यांनी म्हटलंय पश्चिम भारतातील लोक अरब वाटतात. महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे? काँग्रेसला वाटतं की, उत्तर भारतातले लोक गोऱ्यांप्रमाणे दिसतात. तुम्ही हे वक्तव्य मान्य कराल? सत्तेसाठी देशाची वाटणी करणारी काँग्रेस आता भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यावर उतरली आहे.”