मुंबई (प्रतिनिधी) : दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वांनाच भुरळ पाडली होती. त्यांच्या हिम्मतवाला, मवाली, लाडला, लम्हे, चालबाज, चांदनी, मिस्टर इंडिया सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्यांचे 24 फेब्रुवारी 2018 मध्ये दुबईत निधन झाले. यासाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बृहन्मुंबई नगर निगमनं लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका चौकाचं नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसीने लोखंडवाला कॉम्प्लॅक्समधील एका विशिष्ट चौकाला श्रीदेवी कपूर चौक नाव ठेवलं आहे. या चौकाला श्रीदेवी यांचे नाव द्यावे अशी मागणी रहिवासी आणि पालिकेकडून करण्यात आली होती. लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या त्या चौकाचं नाव श्रीदेवी कपूर ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे.

कारण कधीकाळी श्रीदेवी या तिथल्याच ग्रीन एकर्स टॉवरमध्ये राहत होत्या. इतकंच नाही तर त्यांचं पार्थीव देखील त्याच ठिकाणाहून नेण्यात आले होते.