कळे प्रतिनिधी : मल्हारपेठ, ता.पन्हाळा येथे फायटर इलेव्हन स्पोर्टने आयोजित केलेल्या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कळे येथील धर्मराज स्पोर्टस संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दितीय क्रमांक फायटर इलेव्हन स्पोर्टस मल्हारपेठ ने मिळवला. तसेच तृत्तीय क्रमांक कुडित्रे स्पोर्टस कुडित्रे यांनी तर चतुर्थ क्रमांक रामलिंग स्पोर्टस म्हाळुंगे यांना मिळाला. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले होते. तसेच स्पर्धेत मालकावीर सन्मान कळे येथील नितीन शिंदे यांना तर उत्कृष्ठ फलंदाज चा सन्मान मल्हारपेठ येथील योगेश शिंदे यांना तर उत्कृष्ठ गोलदांज चा सन्मान सुनिल शेलार यांना मिळाला.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण देवराज नरके युवा शक्तीचे अध्यक्ष देवराज चंद्रदीप नरके यांच्या यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अरुण पाटील, गोकुळ     पंतसंस्थेचे संचालक पांडूरंग कापसे, सीताराम सातपुते, श्रीकांत कापसे, शेखर पाटील, तरुण भारतचे पत्रकार कृष्णात चौगले, सुधाकर नारकर, दत्तात्रय महाजन,  विनोद कापसे,    प्रल्हाद पाटील, राजेंद्र सातपुते उपस्थित होते. कार्यकमांचे संयोजन शरद सावंत, विशाल पाटील, अजित कापसे, परशुराम सातपुते, प्रफुल्ल नारकर, संदीप नारकर, संतोष नारकर, बबलू सातपुते, सोमनाथ महाजन यांनी केले.